शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

नऊ मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 450 जण पॉझिटिव्ह, 351 जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 7:27 PM

शनिवारी एकूण 4917 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 450 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 4467 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

यवतमाळ: गत 24 तासात जिल्ह्यात नऊ मृत्युसह 450 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 351 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 83, 70, 84 वर्षीय पुरुष आणि 52 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 35 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 60 वर्षीय महिला, दारव्हा येथील 62 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 84 वर्षीय महिला आणि बाभुळगाव तालुक्यातील 76 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि. 3) पॉझेटिव्ह आलेल्या 450 जणांमध्ये 300 पुरुष आणि 150 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 129 जण पॉझेटिव्ह, पुसद 68, वणी 46, उमरखेड 43, दिग्रस 40, आर्णि 24, पांढरकवडा 18, घाटंजी 18, दारव्हा 14, कळंब 14, बाभुळगाव 12, महागाव 7, नेर 6, मारेगाव 2, झरीजामणी 1, राळेगाव 1 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

शनिवारी एकूण 4917 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 450 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4467 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3136 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1310 तर गृह विलगीकरणात 1826 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 30226 झाली आहे. 24 तासात 351 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 26414 आहे. तर जिल्ह्यात एकूण 676 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.74 असून मृत्युदर 2.24 आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 281495 नमुने पाठविले असून यापैकी 278980 प्राप्त तर 2515 अप्राप्त आहेत. तसेच 248754 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे - जिल्हाधिकारी येडगे

जिल्ह्यात 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लस उपलब्ध झाली असून कोव्हीड पासून प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच स्वत:च्या आरोग्याच्या दृष्टीने स्वत: पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आपल्या कुटुंबातील 45 वर्षांवरील सदस्यांना लसीकरणासाठी घेऊन जाण्याची मुख्य जबाबदारी कुटुंब प्रमुखाची आहे. त्यामुळे या गोष्टीला प्रथम प्राधान्य द्यावे. गत दोन दिवसांपासून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 117 लसीकरण केंद्र सुरू असून यात यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण भागातील 51 प्राथमिक आरोग्य केंद्र तर शहरी भागातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्र, 34 उपकेंद्र, 14 ग्रामीण रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालय आणि 10 खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. यवतमाळ शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लोहारा येथील जि.प. शाळा, पाटीपूरा येथील नागरी आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मुलकी उपकेंद्र, आर्णि रोडवरील वडगाव उपकेंद्र, उमरसरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 1 आणि 2 येथे लसीकरण केंद्र सुरू आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ