शहरं
Join us  
Trending Stories
1
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
2
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
3
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
4
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
5
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
6
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
7
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
8
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
9
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
10
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
11
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
12
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
13
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
14
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
15
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
16
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
17
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
18
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
19
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
20
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा

यवतमाळ जिल्ह्यात नाल्यात कोसळलेली बस क्रेनच्या सहाय्याने काढली बाहेर; चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 6:53 PM

Yawatmal News पुराच्या पाण्यात वाहून गेलेली एसटी बस दुपारनंतर बाहेर काढण्यात आली. नाल्यात कोसळल्याने चालक-वाहकासह चार जणांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी संकटकालीन खिडकीतून बाहेर निघाल्याने वाचले आहेत.

ठळक मुद्देमृतांमध्ये चालक, वाहक व दोन प्रवासी

यवतमाळ : पुराच्या पाण्यात वाहून गेलेली एसटी बस दुपारनंतर बाहेर काढण्यात आली. नाल्यात कोसळल्याने चालक-वाहकासह चार जणांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी संकटकालीन खिडकीतून बाहेर निघाल्याने वाचले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास पुसद मार्गावरील दहागाव पुलावर घडली.नांदेडहून पुसदमार्गे नागपूरसाठी निघालेली एम.एच.१४/बी.टी.५०१८ या क्रमांकाची बस उमरखेड पार केल्यांनतर पुसद रोडवर २ किलोमीटर अंतरावर असलेल्या दहागावपर्यंत पोहोचली. याठिकाणी असलेल्या नाल्याला पूर आला होता. तरीही चालकाने या पुरातून बस टाकली. मात्र काही अंतर पार करत नाही तोच बस कलंडायला लागली. त्यानंतर काही क्षणातच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बस नाल्यात वाहून गेली.या बसमध्ये चालक, वाहकचार प्रवासी असे सहा जण होते. यातील दोघे खिडकीतून बाहेर पडल्याने बचावले. यामध्ये शिक्षक असलेले सुब्रमण्यम सूर्यनारायण नोल्ला (४८, रा.दिग्रस, मूळ हैदराबाद), शरद नामदेव फुलमाळी (२७, रा. कारोळ, ता. पुसद) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये चालक सुरेश सुरेवार (५३), वाहक भीमराव नागरीकर, प्रवासी इंदल मेहत्रे (२८, रा. वारा, ता. पुसद), शे. सलीम ऊर्फ बाबू शेख इब्राहीम (४०, रा. वारा, ता. पुसद) यांचा समावेश आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने एसटी बस नाल्यातून थोडी वर उचलत टीडीआरएफच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवचिकित्सेसाठी रवाना करण्यात आले. उमरखेड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. नदी, नाल्यांना पूर आला असून, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना केल्या आहेत.लोकप्रतिनिधी व लोकांचे मदतकार्यएसटी बस पाण्यात कोसळताच लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. सुब्रमण्यम नोल्ला व शरद फुलमाळी हे दोघे संकटकालीन मागार्तून कसेबसे बाहेर पडले. या दोघांनाही पुरातून बाहेर काढण्यात अविनाश सवाई राठोड (रा. वाकन, ता. महागाव) या युवकाने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. खासदार हेमंत पाटील, उमरखेडचे आमदार नामदेव ससाने, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आदींनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप, यंत्र अभियंता अविनाश राजगुरे, विभागीय वाहतूक अधिकारी राठोड, मेश्राम, उमरखेडचे आगार व्यवस्थापक भदाडे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार आनंद देऊळगावकर, ठाणेदार अमोल माळवे या ठिकाणी तळ ठोकून होते.

टॅग्स :Accidentअपघात