लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: बोगस बियाणे नंतर परतीच्या पावसांनी हातातील सोयाबीन पिके गेली. कपाशी पिकांना ही परतीच्या पावसाचा फटका बसला . आता शेतातील कपाशी बोंडात कापसा ऐवजी गुलाबी बोंडअळी निघत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे . शासन दरबारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा न्याय कधी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लोणी येथील शेतकरी अमोल सोळंके, नितीन सोळंके, निलेश सोळंके ह्या तिघां भावाची चौदा एकर शेतात अडीच एकर सोयाबीन तर ११ एकरात कपाशी पिकांची लागवड केली. बोगस बियाणे नंतर परतीच्या पावसानी अडीच एकरातील सोयाबीनचे कवडीचही उत्पादन झाले नाही, कपाशी पिकांवर आपले उत्पादन होईल या आशेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कपाशी बोंडात कापसाऐवजी बोंडअळीच निघत असल्याने संतप्त झालेल्या सोळके कुटंूबीय शेतकऱ्यांनी ११ एकरातील उभ्या कपाशी पिकांत गावातील जनावराचे खांडच सोडले. यामुळे यावर्षी या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होण्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीने त्रस्त शेतकऱ्यांनी ११ एकरातील उभ्या कपाशीवर सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 10:44 AM