शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

यवतमाळ जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 2:38 PM

डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलाने व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण घटत चालले आहे.

ठळक मुद्देउपाययोजना प्रभावहीन१०१ प्रकल्पात केवळ १८ टक्के जलसाठा

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलाने व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी दरवर्षी पाणीटंचाईचे संकट उभे राहते. यंदा तर वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. प्रशासनाच्या उपाययोजना प्रभावहीन ठरत असून गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ शहरात तर तब्बल १२ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.यवतमाळ जिल्ह्यासाठी पाणीटंचाई हा विषय नवीन नाही. उन्हाळा आला की पाणीटंचाई असे समीकरण अलिकडच्या दशकात झाले आहे. यंदा तर वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस झाला. त्यातही यवतमाळ, कळंब आणि राळेगाव या तालुक्यात वार्षिक सरासरीच्या निम्यापेक्षाही कमी पाऊस झाला. जिल्ह्यातील एकाही नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहली नाही. जिल्ह्यातील प्रकल्पातही अत्यल्प साठा आहे. जिल्ह्यातील १०१ प्रकल्पांमध्ये केवळ १८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच काळात या प्रकल्पांमध्ये ५८ टक्के साठा होता. जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पात सध्या १४.३२ टक्के, सात मध्यम प्रकल्पात २६.३३ टक्के आणि ९१ लघु प्रकल्पात २१.८३ टक्के पाणीसाठा आहे. फेब्रुवारी महिन्यातच ही अवस्था आहे तर आगामी चार महिन्यात सर्व प्रकल्प तळाला लागण्याची भीती निर्माण झाली आहे.यवतमाळ जिल्ह्यातून वाहणारी मोठी नदी पैनगंगा कोरडी पडली आहे. या नदीच्या तीरावरील तब्बल ५० गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. नळयोजनेच्या विहिरी तळाला गेल्याने नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. इसापूर येथील प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडावे, यासाठी नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. वणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवरगाव प्रकल्पाचे पाणी निर्गुडा नदीपात्रात सोडले जात आहे. जिल्ह्याचे वाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसद तालुक्यातील माळपठार भागातील ४० गावे पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही गावांची झाली आहे. जिल्ह्यातील १३ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे. प्रशासनाने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, यातील उपाययोजना प्रभावशून्य झाल्या आहे. पाणीच नाही तर आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यवतमाळात बारा दिवसाआड पाणीपुरवठाजिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ शहरात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात पाण्याचा थेंबही नाही. मृत साठ्यातून यवतमाळकरांची तहान भागविली जाते. पाच लाख लोकसंख्येपुढे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेंबळा प्रकल्पावरून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र या उन्हाळ्यात पाणी मिळण्याची खात्री खुद्द प्रशासनही देत नाही. परिणामी यवतमाळ शहरातील काही भागात १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नगरपरिषदेत दररोज पाण्यावरून वाद होत असल्याचे चित्र दिसत आहे.पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडितग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांकडे थकीत वीज बिलापोटी वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील तब्बल ५०० पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे या गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १३३१ पाणीपुरवठा योजनांकडे वीज वितरण कंपनीचे तब्बल २५ कोटी रुपये थकीत आहे.

टॅग्स :Waterपाणी