शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

यवतमाळ जिल्ह्यात तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 1:34 PM

नैसर्गिक असमतोल आणि इतर संकटामुळे पारंपरिक शेती अडचणीत आले आहे. यावर मात करत दारव्हा तालुक्यातील चिखली येथील युवा शेतकऱ्याने तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पादन घेतले. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हळदीच्या विक्रमी उत्पन्नातून प्रगतीचा मार्ग शोधला.

ठळक मुद्देनीलेश डहाकेची यशोगाथा, पारंपरिक पिकांना पर्यायचिखली येथील युवा शेतकरी

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नैसर्गिक असमतोल आणि इतर संकटामुळे पारंपरिक शेती अडचणीत आले आहे. यावर मात करत दारव्हा तालुक्यातील चिखली येथील युवा शेतकऱ्याने तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पादन घेतले. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हळदीच्या विक्रमी उत्पन्नातून प्रगतीचा मार्ग शोधला.नीलेश जयविजय डहाके रा.चिखली (रामनाथ) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. लहानपणापासून त्याला शेतीची आवड आहे. त्यामुळे नोकरी किंवा इतर व्यवसायाच्या मागे न लागता शेतीत करीअर करण्याचे त्याने ठरविले. योग्य पिकांची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मेहनतीच्या बळावर त्याने घाट्याचा व्यवसाय समजल्या जाणाऱ्या शेतीत प्रगती केली आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न चांगले होईल अशा पिकाची त्याने निवड केली. गेल्या दोन वर्षापासून तो हळदीचे पीक घेत आहे. पहिल्या वर्षी दोन एकर क्षेत्रात लागवड केली. गावातील शेतकरी रघुनाथ डहाके यांचे कडून ३६ हजार रुपयांचे बेणे विकत घेतले. पहिल्या वर्षी दोन एकरामध्ये ३०० क्विंटल उत्पन्न झाले. पहिल्याच वर्षी उत्पन्न चांगले झाल्याने उत्साह वाढला. त्यामुळे तीन एकरात हळदीची लागवड केली. घरचे बेणे असल्याने खर्च वाचला. वाही, बेड तयार करणे सिंचन, रासायनिक खते, मायक्रोन्युट्रनचे डोज, निंदन, आंतरमशागत याचे योग्य नियोजन केले. तीन एकरात ६०० क्विंटल उत्पन्न झाले. त्यामधील साडेतीन लाखाची १६० क्विंटल हळद बेणेकरीता विकली. इतर बॉयलरच्या सहाय्याने उकडण्यात आली. सुकलेली हळद १५० क्विंटल आहे. यावर्षी सध्या हळदीचे आठ हजार रुपये क्विंटलचे भाव आहे. त्यामुळे आजच्या बाजार भावाप्रमाणे १२ लाखाची हळद त्याच्याकडे आहे. योग्य भाव मिळताच विक्री करण्याचे ठरविले असल्याचे त्याने सांगितले. आजचा जरी हीशोब लावला तरी तीन एकरात १५ लाखाच्या वर उत्पन्न झाले आहे. शेतीव्यवसायात चांगले उत्पन्न घेऊन नीलेश डहाकेने आजच्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.

वडिलांचा अनुभव भावाचे मार्गदर्शनआपल्या या यशस्वी प्रयोगासाठी वडील जयविजय डहाके यांच्या शेतीतील अनुभवातून बरेच काही शिकता आले. तर थोरला भाऊ शैलेश डहाके यांचे पिकाची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबतचे मार्गदर्शन कामी आल्याचे नीलेशने सांगितले.

टॅग्स :agricultureशेती