लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: अत्यंत चुरशीची होणार म्हणून सर्वांचे लक्ष लागलेल्या यवतमाळ जिल्हा मतदारसंघातील सात मतदारसंघांपैकी तीनमध्ये कमळाने बाजी मारली तर दोन ठिकाणी कांग्रेस व एक-एकठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादीने प्रारंभ केला आहे.वणी मतदारसंघात भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी १६५५ मतांची आघाडी घेतली आहे. आर्णीत काँग्रेसचे अॅड. शिवाजीराव मोघे हे ४३०६ मतांनी पुढे आहेत. राळेगावात भाजपाचे अशोक उईके यांनी ३७९५ हजारांची आघाडी घेतली आहे. यवतमाळात काँग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर हे ३१२५ मतांनी पुढे आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक हे तब्बल ११ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत तर उमरखेडमध्ये भाजपाचे नामदेव सासने हे २८०६ मतांनी पुढे आहेत. दिग्रसमध्ये शिवसेनेचे संजय राठोड हे १७ हजार मतांनी घोडदौड करीत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील सातपैकी पुसद व राळेगाव या मतदारसंघात थेट, आर्णी, यवतमाळ, दिग्रस व उमरखेडमध्ये तिरंगी, तर वणी मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढविली आहे. दिग्रसमध्ये शिवसेना उमेदवार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपचे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी बंडखोरी करीत, दंड थोपटल्याने लढत काट्याची होत आहे. यवतमाळात पालकमंत्री मदन येरावार यांच्यापुढे काँग्रेसने दिलेला नवा चेहरा बाळासाहेब मांगुळकर यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. येथे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे कुणासाठी डोकेदुखी ठरतात, याकडे नजरा लागल्या आहेत.