शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

यवतमाळ शहर पाणीटंचाई क्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 9:41 PM

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ शहराला पाणीटंचाईग्रस्त क्षेत्र म्हणून बुधवारी घोषित केले. यामुळे शहरातील सर्व जलस्रोतांचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच करता येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : आता पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच, प्रशासनाचा सर्वत्र वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ शहराला पाणीटंचाईग्रस्त क्षेत्र म्हणून बुधवारी घोषित केले. यामुळे शहरातील सर्व जलस्रोतांचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच करता येणार आहे. पाण्याचा बांधकामासाठी व इतर प्रयोजनासाठी वापर करणाऱ्यांवर भूजल अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात सध्या ठणठणाट आहे. मृत साठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. यवतमाळकरांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तसेच बेंबळा प्रकल्पाचे पाणीही एवढ्यात यवतमाळकरांना मिळण्याची आशा नाही. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब यवतमाळकरांसाठी महत्वाचा झाला आहे. पाणीटंचाईच्या या काळात पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ शहर पाणीटंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.यवतमाळ शहर पीजीडब्ल्यू-१ व २ या पाणलोट क्षेत्रात समाविष्ठ आहे. जानेवारी महिन्यात करण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींच्या अहवालानुसार सरासरी भूजल पातळी १.६० मीटरने घटल्याचे पुढे आले. शहराची लोकसंख्या आणि उपलब्ध पाणीसाठा याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या उपरही यवतमाळकरांना पाणी मिळत नाही. तर दुसरीकडे बांधकामासह विविध प्रयोजनासाठी पाण्याचा वारेमाप वापर होत आहे. परंतु आता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केल्याने पाणी वापरावर निर्बंध येणार आहे. शहराच्या सार्वजनिक पेयजलाच्या स्रोतापासून एक किलोमीटरपर्यंत असलेल्या विहिरी, विंधन विहिरी, कूपनलिकांचा वापर केवळ पेजयलासाठीच करता येणार आहे. या व्यतिरिक्त इतर कामांसाठी पाण्याचा वापर केल्यास भूजल अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.थेट दंडात्मक कारवाई होणारटंचाई क्षेत्र घोषित झाल्याने शहरातील जलस्रोतांतील पाण्याचा अवैध वापर कुणालाही करता येणार नाही. तसेच शहरात बोअरवेल, विहीर खोदता येणार नाही. पेयजला व्यतिरिक्त पाण्याचा उपसाही करता येणार नाही. परिणामी शहरात सुरू असलेल्या बांधकामांना या निर्णयामुळे मोठा फटका बसणार आहे. मात्र शासकीय बांधकामांना यातून सवलत देण्यात आली आहे. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर फौजदारी संहिता १९७३ च्या अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपविभागीय महसूल अधिकाºयांवर राहणार आहे.१५ फेब्रुवारीपासून १२ दिवसाआड पाणीपुरवठायवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पातील पाण्याची स्थिती लक्षात घेता १५ फेब्रुवारीपासून यवतमाळकरांना १२ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. अपुऱ्या पावसामुळे यंदा निळोणा प्रकल्प कोरडा झाला असून चापडोह प्रकल्पातील अत्यल्प जलसाठ्यावर शहराचा पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या यवतमाळकरांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र चापडोह प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने आता १५ फेब्रुवारीपासून १२ दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ६१ टक्केच पाऊस झाला. त्यातही यवतमाळ तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची बिकट स्थिती निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज आहे. अन्यथा मे महिन्यात भीषण स्थिती ओढवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Waterपाणी