यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळींना काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:03 AM2019-05-23T11:03:11+5:302019-05-23T11:17:20+5:30
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या प्रमुख उमेदवारांसह एकूण 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
वाशिम - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या प्रमुख उमेदवारांसह एकूण 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात जिल्ह्यातील वाशिम व कारंजा या दोन विधानसभा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे की शिवसेनेच्या भावना गवळी यापैकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यवतमाळ-वाशिम मतदारसंघात दहाव्या फेरी अखेर शिवसेनेच्या भावना गवळी यांनी 10258 मतांनी आघाडी घेतली आहे. गवळी यांना 54,310 तर माणिकराव ठाकरे यांना 44,052 मतं पडली आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला धक्केhttps://t.co/fUWIufX59Y#loksabhaElections2019resultspic.twitter.com/fxvBgcv61U
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2019
2014 च्या निवडणुकीत भावना गवळी यांना 4 लाख 77 हजार 905 मतं मिळाली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा पराभव केला होता. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी 11 एप्रिल रोजी मतदान झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सव्वा दोन टक्क्याने वाढ झाली. 2014 मध्ये 58.80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. 19 लाख 14 हजार 785 मतदारांपैकी 11 लाख 69 हजार 806 मतदारांनी 2206 केंद्रांवर मतदानाचा हक्क बजाविला होता.
राज्यात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? https://t.co/u3ncK55QSM#LokSabhaElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2019