रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बचतगटांनी तयार केलेली उत्पादने दर्जेदार असली तरी ही उत्पादने स्थानिकस्तरापुरतीच मर्यादित आहेत. यामुळे बचतगटांचे उद्योग फारसे वाढले नाही. मार्केटिंगचा अभाव हा उद्योगाच्या विकासातील मोठा अडसर मानला जातो. यावर मात करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने अॅमेझॉनशी करार केला आहे. गुरूवारी २५ आॅक्टोबर रोजी बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे एका क्लिकवर या उत्पादनाचे लाँचिंग करणार आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात एक लाख १६ हजार बचतगटांची निर्मिती करण्यात आली आहे. या बचतगटाच्या माध्यमातून राज्यभरात १३ लाख ८७ हजार महिला एकत्र आल्या आहेत. यामधील साडेपाच लाख महिलांनी बचतगटांचे गृह उद्योग सुरू केले आहेत. त्याकरिता बँकांनी दोन हजार १२२ कोटी रूपयांचे कर्ज बचतगटांना दिले आहेत. बचतगटांना वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या माध्यमातून महिला शेती, कृषी सेवा केंद्र आणि गृहउद्योगाची उभारणी केली आहे.महिलांनी उत्पादित केलेल्या या वस्तूंची बाजारात कुठेही तोड नाही. मात्र या वस्तूंचे पाहिजे तसे मार्केटिंग झाले नाही. यामुळे ही उत्पादने गावापुरते मर्यादित राहिले आणि बचतगटाच्या प्रदर्शनापर्यंतच टिकले. त्यानंतरच्या कार्यकाळात या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविताच आल्या नाही. यामुळे बचतगटांचा व्यवसाय मर्यादित राहिला.यावर मात करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने अॅमेझॉन कंपनीशी करार केला आहे. अॅमेझॉनच्या सहेली कॉर्नरवरून या उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. त्यामध्ये स्थानिक जिल्ह्यामध्ये ज्या वस्तूची निर्मिती अधिक होते. इतर ठिकाणी त्याची मागणी असते. मात्र ग्राहकांना त्या उपलब्ध होत नाही. या धावपळीत ग्राहकांना त्या वस्तू घरपोच उपलब्ध करवून दिल्या जाणार आहे. त्याकरिता बचतगटाच्या १५० वस्तू या संकेतस्थळावर ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू आणि हॅन्डमेड वस्तूंचा समावेश आहे. काही खाद्यपदार्थही त्यामध्ये नोंदविण्यात आले आहे.तूरडाळ, नाचणी आणि टसर सिल्कयवतमाळची तूर डाळ, हळद पावडर, भंडारा जिल्ह्यातील टसर सिल्क, जळगावचे केळी वेफर्स, मोहचे लाडू, रत्नागिरीचे नाचणी बिस्कीटे, नाचणी पावडर, सिंधुदुर्गचे काजू , कोकम या सारख्या अनेक वस्तू क्लिकवर मिळणार आहे. यामुळे बचतगटांचे आर्थिक स्थैर्य वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे.महिला बचतगटांना सक्षम करण्यासोबत त्यांची उत्पादने घराघरात पोहचावी म्हणून माविम सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यातूनच अॅमेझॉनशी करार करण्यात आला आहे. यामुळे बचतगटांची चळवळ मजबूत होणार आहे.- महेश पाखरे,सहायक व्यवस्थापकमहिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
यवतमाळच्या बचतगटांची उत्पादने देशपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 9:55 PM
बचतगटांनी तयार केलेली उत्पादने दर्जेदार असली तरी ही उत्पादने स्थानिकस्तरापुरतीच मर्यादित आहेत. यामुळे बचतगटांचे उद्योग फारसे वाढले नाही. मार्केटिंगचा अभाव हा उद्योगाच्या विकासातील मोठा अडसर मानला जातो.
ठळक मुद्देथेट अॅमेझॉनशी करार : महिला आर्थिक विकास महामंडळाचा पुढाकार, एका क्लिकवर घरपोच सेवेचे आज लॉचिंग