यवतमाळ : सीबीएसई बारावीच्या परीक्षेत प्राची प्रसन्न सुराणा ही यवतमाळ पब्लिक स्कूलमधून पहिली आली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने ८७ टक्के गुण घेतले. गणित, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री आदी विषयात प्रावीण्य प्राप्त केले. तिने आर्किटेक्ट होण्याचा मानस व्यक्त केला आहे. येथील आर.के. एजन्सीजचे संचालक प्रसन्न महेंद्रकुमारजी सुराणा यांची ती कन्या आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आजोबा महेंद्र सुराणा, आजी प्रेमलता सुराणा, आई राखी सुराणा आणि वडिलांना देते. तिच्या यशाचे यवतमाळ पब्लिक स्कूल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास, सकल जैन समाज आणि भारतीय जैन संघटनेने कौतुक केले. (वार्ताहर)
यवतमाळ पब्लिक स्कूलची प्राची सुराणा बारावीत पहिली
By admin | Published: May 25, 2016 12:06 AM