शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

यवतमाळात आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर पांढरकवडा एसडीपीओंची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 2:14 PM

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील सुर्दापूर येथील आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या पथकाने धाड घातली. या धाडीत तेलंगणा-आंध्रप्रदेशातील रंगारेड्डी, करीमनगर, आदिलाबाद, हैदराबाद, जगतीयार या जिल्ह्यातील २३ जणांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्दे५५ लाखांचा मुद्देमाल जप्ततेलंगणा-आंध्रातील २३ जणांना अटक

आॅनलाईन लोकमतपांढरकवडा (यवतमाळ) : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील सुर्दापूर येथील आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या पथकाने धाड घातली. या धाडीत तेलंगणा-आंध्रप्रदेशातील रंगारेड्डी, करीमनगर, आदिलाबाद, हैदराबाद, जगतीयार या जिल्ह्यातील २३ जणांना अटक करण्यात आली.पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुर्दापूर येथे जयराम अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या जिनिंग शेडमध्ये हा जुगार अड्डा गेल्या कित्येक महिन्यांपासून राजरोसपणे सुरू होता. दरम्यान शुक्रवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरुन पांढरकवडा एसडीपीओ अमोल कोळी यांनी तेथे धाड घातली. या धाडीत दोन लाख ५४ हजार रुपये रोख, २३ मोबाईल हॅन्डसेट, ३२ हजारांचे जुगार साहित्य, १२ चारचाकी वाहने असा एकूण ५५ लाख ४९ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राजकुमार मोहन गुंडेकारी (३८) रा. गुंडेदू ता. कमलापूर जि. वरंगल, शंकर चेरालू कोडीगुटी रा. मलकागिरी, मल्लिकार्जुन नगर रेल्वेस्टेशन समोर रंगारेड्डी, अनिल सहदेव रेड्डी कोला रा. कापूवाडा बीएसएनएल टॉवरजवळ करीमनगर, सुधाकर पोचया मल्लेपुल्ला रा. ओल्डबाजार करीमनगर, राजारेड्डी मल्लारेड्डी अल्ला रा. मुंझमपल्ली करीमनगर, तिरुपतया लिंगारेड्डी गुड्डा रा. बोमाकल करीमनगर, तिरुपती रेड्डी रामक्रिष्णा रेड्डी माढा रा. कोंडपल्कस ता. मानाकोंडू जि. करीमनगर, लिंगारेड्डी राजारेड्डी सुराकांती रा. गोंदूर ता. इब्राहीम पटणम जि. जगितयाल, महेंदर लिंगारेड्डी गोका रा.बुक्तापूर जि. आदिलाबाद, चंद्रशेखर मोगीलया कोंडुरी रा. हुसनाबाद जि. करीमनगर, जगन हनुमंडलू यामसानी रा. गेटपट्टी जि. जगतियार, राजेश कुमार सुंदरराव यादागिरी रा. अकोलीबग्गी ता. केळापूर जि. यवतमाळ, महिपाल लिंगया मेढा रा. मुझमपल्ली ता. मानाकोंडू जि. करीमनगर, नागराज किस्ट्या मड्डी रा. नामपल्ली जि. करीमनगर, सुरेश कोंड्या मंडला रा. अंबरपेठ जि.हैदराबाद, येलय्या मलेश नागापुरी रा.रेकुरती जि. करीमनगर, उमेश राजेश अकुला रा. विद्यानगर हाऊस जि. आदिलाबाद, श्रीनिवास येलय्या बालावेणी रा. कोठीरापूर करीमनगर, सुरेंदर येलया लखा रा. उरुस बोडराईजवळ वारंगल, तिरुपती रामरेड्डी लिंगल्ला रा. करीमनगर, भुमरेड्डी तिरुपती रेड्डी अल्लला रा. पोरंडला ता. थिमापूर जि. करीमनगर, संतोष सितया सुधागोणी रा. रंगापूर ता. पेदापल्ली करीमनगर आणि नरेश नरसिंगराव रेनीकुंटला रा. रेल्वे स्टेशनजवळ वरंगल आदींवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांना अटकही करण्यात आली.पांढरकवडा अवैध धंद्यांचे मुख्य केंद्रराष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर वसलेले पांढरकवडा हे शहर जुगार, दारू, प्रतिबंधित गुटखा, कत्तलीसाठी जाणारी जनावरे व अन्य अवैध धंद्यांचे मुख्य केंद्र बनले आहे. नुकतीच वणी पोलिसांनी चंद्रपूरकडे जाणारी १८ लाखांची दारू जप्त केली होती. ही दारू पांढरकवड्यातून ट्रकमध्ये लोड करण्यात आल्याचे सांगितले जाते. तेलंगणातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणला जातो. पाटणबोरीत त्याचा साठा केला जातो. पिंपळखुटी व परिसरात तसेच पांढरकवडा शहरात जुगार, क्रिकेट सट्ट्याचे अनेक केंद्र आहेत. हे अड्डेसुद्धा उद्ध्वस्त करण्याचे आव्हान एसडीपीओ अमोल कोळी यांच्यापुढे आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा