मारेगाव (जि. यवतमाळ) : धरणाच्या प्रश्नावरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलेले भाजपचे वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेनेचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्यात तालुक्यातील हटवांजरी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी शनिवारी दुपारी बाचाबाचीनंतर चक्क एकमेकांच्या अंगावर धावून गेले. ‘हे तुमच्या सरकारचे पाप आहे’ असा आरोप दोघांनीही एकमेकांवर केला. त्यामुळे वादाची ठिणगी पेटली. विश्वास नांदेकर थेट आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अंगावर धावून गेले. मात्र, उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. हटवांजरी येथील खोदकाम सुरू असलेल्या धरणाच्या जागेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शनिवारी नांदेकर आंदोलनस्थळी पोहोचले. ते आंदोलकांशी चर्चा करीत असतानाच तेथे आमदार बोदकुरवारही पोहोचले होते. दोघेही शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. त्यावरून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
धरणाची मंजुरी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात आणि शेतकऱ्यांचे सातबारावरून नाव कमी करण्याचा प्रकार महाविकास आघाडीच्या काळात घडला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५मध्ये मोबदल्यात वाढ केली होती. यावरून वाद झाला. संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदारमी आमदार बोदकुरवार यांना सन्मानपूर्वक बसायला जागा दिली. मात्र, त्यांनी या सर्व प्रकरणाला ठाकरे सरकार दोषी आहे, असा आरोप केला. यावरून वाद झाला. ठाकरे सरकारवर अकारण टीका सहन करणार नाही.विश्वास नांदेकर, माजी आमदार