शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

Yavatmal: कडेकाेट बंदाेबस्तानंतरही उबाठा सेनेचे आंदाेलन, मुख्यमंत्र्याच्या सभास्थळी उडाला गाेंधळ, पाेलिसांची धावपळ

By सुरेंद्र राऊत | Published: October 30, 2023 7:32 PM

Yavatmal News: यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर किन्ही येथे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. यासाठी काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसह मराठा आंदाेलकांची धरपकड करण्यात आली. त्यानंतरही गनिमी कावा पध्दतीने उबाठा सेनेच्या सैनिक थेट सभास्थळाच्या प्रवेश दारावर पाेहाेचले.

- सुरेंद्र राऊतयवतमाळ -  शहरातील आर्णी मार्गावर किन्ही येथे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. यासाठी दाेन दिवसापासूनच शहरात कडेकाेट बंदाेबस्त लावण्यात आला. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसह मराठा आंदाेलकांची धरपकड करण्यात आली. त्यानंतरही गनिमी कावा पध्दतीने उबाठा सेनेच्या सैनिक थेट सभास्थळाच्या प्रवेश दारावर पाेहाेचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा येताच आंदाेलकांनी फलक दाखवत ‘शेत मालाला भाव नाही म्हणे शासन आपल्या दारी’ अशा घाेषणा देत निषेध केला. 

शासन आपल्या दारी कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्रांच्या सभेत काळे झेंडे दाखवत शेतकरी व ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. कापसाला भाव द्या, सोयाबिनला भाव द्या, शेत खर्डीचे पैसे द्या या घोषणेसह पन्नास खोके एकदम ओके,गद्दार गद्दार अश्या घोषणा देऊन शिंदे,राठोड व भावना गवळी यांचा तीव्र निषेध केला. सभास्थळी या वेळी एकच गोंधळ उडाला होता. पाेलिसांनी निर्दशने करणारे किशोर इंगळे,ऍड.श्रीकांत माकोडे, कल्पना दरवई, गजानन पाटील, अतुल गुल्हाने, मंदाताई गाडेकर,गणेश महाराज चांदेकर, संतोष गदई, नंदाताई भिवगडे, सुनीता हरणखेडे, गोलू जोमदे यांनाना ताब्यात घेऊन अटक केली. तर जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, अनिल डिवरे यांना सभास्थळी जाण्यापूर्वीच आर्णी रोडवर ताब्यात घेतले. यांनतर संभाजी ब्रिगेडचे सुरज खाेब्रागडे यांनी विविध मागण्यासाठी हाता फलक घेवून निर्दशने केली. शासनान शेतकऱ्याचे मरण आपल्या दारी असे अभियान राबवत असल्याचा आराेप त्यांनी केला. पाेलिसांनी त्यांनाही तत्काळ ताब्यात घेवून अटक केली.

राज्यभर पेटलेल्या मराठा आंदाेलनामुळे कार्यक्रम स्थळी गाेंधळ हाेवू नये यासाठी पाेलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त लावण्यात आला. त्यानंतरही साेमवारी सकाळीच अज्ञाताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकाला काळे फासले, तर काही फलक फाडून टाकले. ऐन वेळेवर नगरपालिकेच्या यंत्रणेने हे फलक काढून टाकण्यासाठी धडपड केली. यापूर्वीच शहरासह जिल्ह्यातील मराठा आंदाेलकासह , काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट) या कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यांना यवतमाळ पासून ११० किलाेमीटश्र अंतरावर असलेल्या वणी पाेलिस ठाण्यात स्थानबध्द करून ठेवण्यात आले हाेते.

टॅग्स :YavatmalयवतमाळEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना