शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातच लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:00 PM

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या राजकीय भवितव्याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. परंतु या चर्चा केवळ अफवा असून आपण यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातूनच.....

ठळक मुद्देभावना गवळींनी केला संभ्रम दूर : दिग्रस वगळता अन्य विधानसभा मतदारसंघांची दिशा ठरविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या राजकीय भवितव्याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. परंतु या चर्चा केवळ अफवा असून आपण यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातूनच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याचे खुद्द गवळी यांनीच स्पष्ट केले आहे.बुधवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामभवनावर भावनातार्इंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. भावनाताई यावेळी यवतमाळ-वाशिममधून लढणार नाहीत, हिंगोलीत जाणार, रिसोड विधानसभा लढणार, भाजपात जाणार या सर्व अफवाच असल्याचे भावना गवळी यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, २००९ पासून आपल्या लोकसभेतील उमेदवारीबाबत मनगढंत चर्चा रंगविल्या जातात. मात्र आपण यवतमाळ-वाशिम मतदारसंघात कायम आहोत. माझ्या लोकसभा क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्र येतात. यापैकी दिग्रस-नेरमध्ये शिवसेना मजबूत आहे. उर्वरित तीन विधानसभेतही शिवसेनेने चांगली पकड घेतली आहे. यात यवतमाळ व कारंजा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेनेतील कोणताही गट स्वत:चे हित जोपासण्यासाठी नसून पक्ष कसा बळकट होईल, याचा विचार करतो. एखाद्या पदाबाबत मंत्र्यांसोबत टाय झाला. मात्र त्यांचा दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघ सोडून इतर ठिकाणच्या ध्येय धोरणाची दिशा ठरविण्याचा अधिकार आपल्याला आहे. बरेचदा लगतच्या हिंगोली मतदार संघातील कार्यकर्त्यांकडून तेथून निवडणूक लढविण्याचा आग्रह केला जातो. मात्र ते त्यांचे प्रेम आहे. तथापि काम करताना मतदार संघाची मर्यादा आपण बाळगत नाही. त्यामुळे हिंगोली व अकोला क्षेत्रातील अनेक जण आपणाशी जुळले आहे. यातूनच ही चर्चा घडवून आणली जाते, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, संजय रंगे, किशोर इंगळे, यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गजानन डोमाळे आदी उपस्थित होते.तिसऱ्या जिल्हा प्रमुखाची होणार एन्ट्री१६ तालुके व जिल्ह्याचा एकूण भौगोलिक व्याप लक्षात घेता शिवसेनेत आता दोन नव्हे तर तीन जिल्हा प्रमुख राहणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच ही नवी संकल्पना राबविली जाणार आहे. तिसऱ्या जिल्हा प्रमुखासाठी नावांचा प्रस्ताव ‘मातोश्री’कडे पाठविण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे खासदार भावना गवळी यांनी स्पष्ट केले.शिवसेनेचे चार आमदार निवडून येऊ शकतातजिल्ह्यात यवतमाळ, उमरखेड आणि वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना निर्णायक आहे. येथे आणखी थोडा जोर लावल्यास जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार सहज निवडून येऊ शकतात. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पक्ष बांधणीबाबत भूमिका मांडली आहे. लवकर त्यावर सकारात्मक आदेश येणार असल्याचा विश्वास खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळी