शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

यवतमाळचा पाणीपुरवठा आठ दिवसांत पूर्ववत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 21:53 IST

फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळकरांना खूशखबर. येत्या आठ दिवसात शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली.

ठळक मुद्देप्राधिकरणाची माहिती : निळोणा धरणावरून पाणीपुरवठा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळकरांना खूशखबर. येत्या आठ दिवसात शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली. गुरुवारपासून निळोणा धरणावरून पाणीपुरवठा सुरू झाला असून चापडोहवरुन पाणीपुरवठा होणाऱ्या भागांना आणखी आठ दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.यवतमाळ शहरात यंदा अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली. पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल झाले. प्रशासनाने केलेले सर्व उपाय फेल गेल्याने नागरिकांना अक्षरश: पाणी विकत घ्यावे लागले. अशा स्थितीत सर्वांची आशा पावसावर होती. अपेक्षेप्रमाणे मृगनक्षत्राच्या पूर्वसंध्येपासून यवतमाळ शहरात जोरदार पाऊस बरसला. १० जूनपर्यंत यवतमाळ शहरात ११७ मिमी पावसाची नोंद झाली. सतत पाच दिवस कोसळलेल्या या पावसाने यवतमाळ शहराच्या जीवनदायी निळोणा प्रकल्पात जलसाठा झाला. पुरेसा जलसाठा नसला तरी शहराला पाणीपुरवठा होईल एवढे पाणी या प्रकल्पात गोळा झाले आहे. त्यामुळेच जीवन प्राधिकरणाने या प्रकल्पात उपलब्ध जलस्रोताचे वितरण करण्याचा निर्णय घेतला. या जलसाठ्यावर इमरर्जन्सी पंप बसवून १४ जूनपासून निळोणा धरणावरून होणाºया भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सदर पाणीपुरवठा हा आधीच्याच नियोजनाप्रमाणे राहणार आहे. निळोणा प्रकल्पावरून शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागाला चांगलाच दिलासा मिळाला आहे.तर शहरातील दर्डानगर, सुयोगनगर, लोहारा, वाघापूर नाका, पिंपळगाव, वैभवनगर येथील टाकीच्या माध्यमातून चापडोह प्रकल्पाचे पाणी पुरविले जाते. त्यापैकी सुयोगनगर आणि लोहारा टाकीत गोखीचे पाणी येत आहे. आता येत्या आठ दिवसात चापडोह धरण परिसरातून पाणीपुरवठा होणाºया भागालाही निळोणातूनच पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी फ्लोटिंग पंप आणि निळोणा व चापडोह पाईपलाईनच्या क्रॉस कनेक्शनचे काम सुरू आहे. त्यासाठी आणखी आठ दिवसाचा अवधी लागणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. धरणातील उपलब्धतेनुसार यवतमाळ शहरात पाणीपुरवठा कालावधी ठरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.अखेर निळोणाच धावला मदतीलायवतमाळातील भीषण टंचाई काळातही भ्रष्ट कामकाजामुळे बेंबळा व पर्यायी व्यवस्था असलेल्या गोखी प्रकल्पाचे पाणी संपूर्ण उन्हाळाभर मिळू शकले नाही. पहिल्या पावसातच कोरडा ठण्ण झालेल्या निळोणा प्रकल्पाच्या पातळीत वाढ झाली. जानेवारीपासून टंचाईच्या झळा सोसत असलेल्या यवतमाळकरांच्या मदतीला अखेर निळोणा प्रकल्पच धावून आला. पाणीटंचाई उपाययोजनाचे केवळ यवतमाळात राजकारण करण्यात आले. श्रेयासाठी धडपडत असताना यवतमाळकर पाण्याविना तडफडले.

टॅग्स :Nilona Damनिळोणा धरण