शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

गणेशोत्सवात आंतरराष्ट्रीय सजावट आणि विधायक संदेश स्पर्धेत यवतमाळचा डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 11:55 AM

ऑनलाईन घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सजावट आणि विधायक संदेश स्पर्धेत यवतमाळच्या एका गणपती मूर्तीने बक्षिस पटकावून सातासमुद्रापार आपला झेंडा रोवला.

ठळक मुद्देदीड लाख स्पर्धकांमध्ये यवतमाळचा गणपती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जगात गणेश भक्तांची मोठी संख्या आहे. यामुळे संपूर्ण जगभर गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे त्यावर विरजण पडले. मात्र ऑनलाईन घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सजावट आणि विधायक संदेश स्पर्धेत यवतमाळच्या एका गणपती मूर्तीने बक्षिस पटकावून सातासमुद्रापार आपला झेंडा रोवला.

गणेश चतुर्थी देशातच नव्हे, तर जगभरात साजरी केली जाते. या अनुषंगाने जॉर्जीया देशात युपी टिव्हीने घरगुती गणेश उत्सवाची उत्कृष्ट सजावट आणि विधायक संदेश ही ऑनलाईन स्पर्धा घेतली. या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझिलन्ड, सौदी अरेबिया, न्यूझिलन्ड बिच, यूएसए, कॅनडा आदी देशांमधील सुमारे दीड लाख गणेश भक्तांनी सहभाग नोंदविला. यातून २० स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यात उत्तम सजावट, उत्कृष्ट मांडणी, संकल्पना आणि रेखीव गणेश मूर्तींचा समावेश होता. या स्पर्धेत यवतमाळातील घरगुती गणेश उत्सवाची नोंद घेण्यात आली. यात सुबक मूर्ती आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरील देखाव्यासाठी यवतमाळच्या र्स्पधकाला बक्षिस घोषित झाले आहे.यवतमाळातील मारवाडी चौक स्थित सुमित हेमंत महेंद्रे असे विजेत्याचे नाव आहे. त्यांचे कुटुंबीय गत ५४ वर्षांपासून घरगुती गणेश उत्सव साजरा करते. प्रत्येकवर्षी आकर्षक देखावा केला जातो. त्यामुळे त्यांच्या घरचा गणेश उत्सव शहरात चर्चेचा ठरतो. यावर्षी सुमितच्या गणेशोत्सवाने थेट सातासम्रुदापार झेप घेतली.

जार्जीयाच्या यूपी टिव्हीने घेतलेल्या ऑनलाईन घरगुती गणेश उत्सव स्पर्धेत आकर्षक मूर्ती, डेकोरेशन आणि विशेष थिम, यावर २० उत्कृष्ट गणेश भक्तांची निवड करण्यात आली. त्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझिलन्ड, सौदी अरेबिया, न्यूझिलन्ड बिच, यूएसए, कॅनडा येथिल स्पर्धक विजेते ठरले. त्यात भारतातील पाच गणेश भक्तांचा समावेश आहे. या पाचमध्ये यवतमाळातील सुमित हेमंत महेंद्रे यांच्या मूर्तीचा समावेश आहे. त्यांची मूर्ती आकर्षक आणि लक्ष वेधणारी ठरली. तसेच उत्तम डेकोरेशन, वैविध्यपूर्ण कल्पनाही होती. ब्राम्हण वेषातील बाल गणेशासोबत लक्ष्मी, सरस्वती आणि मूषक होते.याशिवाय सुमितने कोरोना जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविला. यात भाविकांना सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळल्यानंतरच दर्शन दिले. यामुळे कोरोनाला अटकाव करता येत होता. यामुळे सुमितच्या गणेश उत्सवाची नोंद घेतली गेली. त्याला सन्मानपत्र दिले जाणार आहे.मुंबईच्या स्पर्धेत सन्मानचिन्ह मिळणारमुंबई येथील गणपती टिव्हीनेही राज्यभरात गणेश सजावटीची स्पर्धा घेतली. या स्पर्धेतही सुमितला यावर्षीचा उत्कृष्ट गणेश मूर्ती आणि सजावटीसाठी पुरस्कार घोषित झाला आहे. या सजावटीत त्याने वेरूळ येथील अजंठा लेणीच्या मूर्तीचे नक्षीकाम केले होते.दुर्मीळ नाणे, टाकावू वस्तूंचा वापरसुमितने यापूर्वी दुर्मीळ नाणे, डिस्पोजल वस्तू आणि चलनातील नाण्यांपासून डेकोरेशन तयार केले होते. त्यावेळी गणेश दर्शनासाठी प्रचंड वर्दळ होती. यावर्षी आकर्षक मूर्ती आणि विविध समाजप्रबोधनपर संदेशाने ही गर्दी नियंत्रणात होती. ऑनलाईन दर्शनावर त्यांनी भर दिला होता.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव