शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
2
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
3
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
4
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
6
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
7
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
8
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 
9
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
10
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
11
नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...
12
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
13
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
14
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
15
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
16
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
17
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
18
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
19
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
20
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

श्रीदेवीच्या हस्ते यवतमाळकन्येचा झाला होता गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 9:11 PM

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाने देशभरातील रसिकांच्या मनाला चटका लागलेला आहे. श्रीदेवीच्या हस्ते गौरव झालेल्या यवतमाळच्या कन्येला मात्र ही वार्ता कळताच अश्रू अनावर झाले.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाने देशभरातील रसिकांच्या मनाला चटका लागलेला आहे. श्रीदेवीच्या हस्ते गौरव झालेल्या यवतमाळच्या कन्येला मात्र ही वार्ता कळताच अश्रू अनावर झाले.ललिता अभय टोंगो असे या कलावंत कन्येचे नाव आहे. २००३ सालची गोष्ट आहे. ललिता येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात बीए करीत होत्या. त्यावेळी अमरावती येथे झालेल्या ‘युथ फेस्टिवल’मध्ये त्यांनी कला सादर केली. पहिला क्रमांकही पटकावला. त्यावेळी श्रीदेवी बक्षीस वितरणासाठी अमरावतीत आल्या होत्या. ललिता यांना पारितोषिक देताना श्रीदेवी म्हणाल्या होत्या, लहानशा कुटुंबातून एखादी मुलगी कला सादर करण्यासाठी इथपर्यंत पोहोचते हीच महत्त्वाची गोष्ट आहे. कलाकार आणि कलेविषयी प्रचंड आदर श्रीदेवीने व्यक्त केला होता. तेव्हा खास श्रीदेवीला पाहण्यासाठी म्हणून प्राची इनामदार, प्रिती पेशवे या मैत्रीणी व डॉ. कुडमेथे ललिता टोंगो यांच्यासोबत उपस्थित होते. ललिता सध्या ‘युएसए’मध्ये असून श्रीदेवीच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांनी वडिलांंना फोन करून आठवणी जागविल्या. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.