लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील निवृत्त अभियंत्यांनी एकत्र येत मेळघाटातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात दिला आहे. या कामामध्ये त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना समावून घेतले. यवतमाळकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामुळे हजारो कपडे यवतमाळातून थेट मेळघाटात पोहचले आहेत. इतकेच नव्हेतर बालमनावर संस्कार घडविण्याचे कामही निवृत्त मंडळींनी सुरू केले आहे.निवृत्तीनंतर पुढे काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र काही मंडळी निवृत्तीनंतरही तितकीच उत्साही राहून समाजासाठी झटते. असा एक गृप जर एकत्र आला तर नवा बदल घडतो. निवृत्त अभियंता मंडळाने असेच काम सुरू केले आहे. चार वर्षांपासून मंडळांनी मेळघाटातील आदिवासी बांधवांना कपडे पाठविण्याचा उपक्रम हाती घेतला. प्रत्येकाकडे कपडे असतात. मात्र यातील अनेक कपडे कपाटात पडून राहतात. हे कपडे गरजवंताप्ांर्यंत पोहचले तर त्याचा खरा वापर होईल. यामुळे निवृत्त अभियंता मंडळांने चांगले कपडे दान देण्याचे आवाहन नागरिकांना केले. आतापर्यंत जिल्ह्यातून १६ हजार कपडे मिळाले. हे कपडे त्यांनी मेळघाटातील आदिवासींना पोहचविले आहेत.या उपक्रमासोबत निवृत्त अभियंता मंडळाने उन्हाळ्यात बालकांना संस्कारित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये भारतीय संस्कृतीमधील वडीलधाऱ्यांप्रती आदरभाव, अभ्यास, खेळ, गीत आणि इतर विषय शिकविले जात आहे. हुशार आणि आर्थिक स्थितीने कमी असलेल्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून शिष्यवृत्ती आणि सायकल देण्याचा उपक्रमही मंडळ राबवित आहे. संघटनेचे अध्यक्ष गोपाळ भास्करवार, उपाध्यक्ष वसंत पांडे, सचिव उत्तम राठोड, कोषाध्यक्ष अशोक तिखे, श्रीकृष्ण बनसोड यांच्यासह अनेक मंडळी या उपक्रमात सहभागी आहे.
मेळघाटातील आदिवासींसाठी सरसावले यवतमाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 9:38 PM
जिल्ह्यातील निवृत्त अभियंत्यांनी एकत्र येत मेळघाटातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात दिला आहे. या कामामध्ये त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना समावून घेतले. यवतमाळकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामुळे हजारो कपडे यवतमाळातून थेट मेळघाटात पोहचले आहेत.
ठळक मुद्देनिवृत्त अभियंत्यांचा पुढाकार । कपड्यांसह पाठविले विविध साहित्य