लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रजासत्ताक दिनी येथील नागरिकांनी वंचित घटकातील मुलांच्या ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेला अन्न-धान्याची भरघोस मदत दिली. येथील सुयोगनगर बालोद्यान, जेष्ठ नागरिक विसावा आणि ग्रूप आॅफएकवीराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षी भारतमाता पूजनाचा कार्यक्रम आयोजित करून वंचितांना मदत दिली जाते.लोकसहभागातून स्वत:चे बालोद्यान उभारण्याचा उपक्रम हे नागरिक राबवितात. पण फक्त स्वत:च्या कॉलनीत उद्यान बाधून थांबत नाही तर गेल्या ५ वर्षांपासून एक अभिनव उपक्रम राबवितात. तो उपक्रम म्हणजे, २६ जानेवारी रोजी भारतमातेच्या पूजनाचा. त्या उपक्रमातून गरजू संस्थांना मदत दिली जाते. मागील वर्षी उमरी पठार येथील वृद्धाश्रमात २ महिने पुरेल इतका किराणा त्यांनी दिला. या वर्षी प्रश्नचिन्ह आश्रमशाळेला मदत देण्यात आली. गव्हाचे ११ कट्टे, तेलाचे ७ पिपे, २ मिठाचे कट्टे, ८५ किलो साखर, २० किलो मोट, चणा १० किलो, ५ किलो रवा, ६० किलो पोहा, औषधी ठेवण्याची बॅग, ६ बॉटल, ३ पाणी जग, ५ डझन पेन, ५ डझन पेनसिल, दोन शिलाई मशिन आदी साहित्य देण्यात आले. ही मदत देण्यासाठी प्रत्यक्ष आश्रमशाळेत ४५ जण पोहोचले होते. या निमित्ताने घरातील आबालवृद्ध एकत्र येतात. तसेच अनंत कौलगीकर, रमेश महामुने, मंगेश खुणे यांनी वर्गणी करून २० हजारांची रोख रक्कम तसेच डॉ. अमर काबरा यांनी दिलेल्या ४५० खास मुलांच्या पेस्ट आश्रमशाळेचे संचालक मतिन भोसले यांना सुपूर्द केल्या.
यवतमाळकरांचे आगळे भारतमाता पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 9:40 PM
प्रजासत्ताक दिनी येथील नागरिकांनी वंचित घटकातील मुलांच्या ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेला अन्न-धान्याची भरघोस मदत दिली. येथील सुयोगनगर बालोद्यान, जेष्ठ नागरिक विसावा आणि ग्रूप आॅफएकवीराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
ठळक मुद्देवंचितांना मदत : प्रश्नचिन्ह आश्रमशाळेला नेऊन दिले अन्नधान्य