शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

बाबासाहेबांची यवतमाळातील जयंती महाराष्ट्रात प्रसिद्ध

By admin | Published: April 14, 2017 2:48 AM

बाबासाहेबांचा भारतातील पहिला जयंती सोहळा यवतमाळात झाला, असे वडीलधारे सांगायचे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आठवणींना उजाळाअविनाश साबापुरे यवतमाळ बाबासाहेबांचा भारतातील पहिला जयंती सोहळा यवतमाळात झाला, असे वडीलधारे सांगायचे. अख्ख्या महाराष्ट्रात यवतमाळची जयंती प्रसिद्ध होती. कारण इथला कार्यक्रमच तसा शिस्तबद्ध होता. हत्ती, घोड्यांवरून मिरवणूक निघायची. समोर लेझीम पथक, बैलबंडी आणि संपूर्ण मिरवणुकीला संरक्षण असायचे समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचे... ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व बुद्धिस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टेंभुर्णे सांगत होते, परिवर्तनाच्या विचारांनी भारलेल्या काळाच्या आठवणी!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’शी ते बातचित करीत होते. रवींद्र टेंभुर्णे यांचे वडील बालाराम टेंभुर्णे हे तत्कालीन समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अन् बाबासाहेबांचे निष्ठावंत पाईक. तेथपासून म्हणजे १९३६ च्या काळापासून या आठवणींचा पट उलगडत गेला. कव्वाली, कलापथके, जलसे यांचाही जयंती उत्सवात समावेश असायचा. सासुरवाशीण मुलींना कोणीही दिवाळीत माहेरी आणण्याऐवजी बाबासाहेबांच्या जयंतीला आणत होते. आज काही गोष्टी मागे पडल्या. मिरवणुकीत जल्लोष जरूर करावा, मात्र डीजे लावून नुसतेच नाचणे म्हणजे बाबासाहेबांना अभिवादन नव्हे, असे ठाम मत रवींद्र टेंभुर्णे यांनी व्यक्त केले. कोलाहल माजेल, शिस्त बिघडेल, असे वर्तन टाळावे. आंबेडकरी तरुणांनी १८ तास अभ्यास करूनच महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन टेंभुर्णे यांनी केले. अन्न स्वाहा करणारा यज्ञ उधळलाबाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले कार्यकर्ते तेव्हा कोणत्याही गैरप्रकाराला कसा कडाडून विरोध करायचे, याची एक आठवण रवींद्र टेंभुर्णे सांगतात. १९६९ च्या सुमाराची ही गोष्ट. यवतमाळात दुष्काळाची स्थिती होती. अशात काही मंडळींनी आझाद मैदानात यज्ञ आयोजित करून तुप, तेल, धान्य त्यात स्वाहा करण्याचा घाट घातला होता. शंकराचार्य येणार होते. आम्ही दलित पँथर, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. तुम्ही यज्ञ जरून करा, पण एवढे अन्न वाया घालवू नका, असा हट्ट धरला. शेवटी तो यज्ञच बारगळला. सोशल मीडियातील वाद टाळाआजही समाजातून अंधश्रद्धा संपलेली नाही. कट्टर धार्मिकवाद, जातीवाद नष्ट करून समतेच्या मूलतत्त्वाचा प्रसार झाला पाहिजे. समाज माध्यमांवर आज महापुरुषांविषयी खूप उलटसुलट माहिती बघायला मिळते. मात्र समाज माध्यमांवर संयम बाळगावा. मोबाईलवर वाद करण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करावी, असे आवाहन रवींद्र टेंभुर्णे यांनी केले.आंबेडकर आखाडा यवतमाळची ओळखयवतमाळच्या पाटीपुऱ्यात डॉ. आंबेडकर आखाडा १९३६ मध्ये निर्माण करण्यात आला. साधारण ३०० महिला-पुरुष तेथे लाठीकाठीचे प्रशिक्षण घ्यायचे. महादेव मेश्राम, सदाशिव भागवत, प्रभाकर टेंभुर्णे, बालाराम टेंभुर्णे या आखाड्याचे वस्ताद होते. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तेव्हा या आखाड्याचा खास सहभाग असायचा. रेतीची गाडी छातीवरून चालवणे, अणकूचीदार खिळ्यावर झोपून छातीवर घणाने दगड फोडणे, डोळ्यांच्या कडांनी गज वाकवणे असे साहसी प्रकार सादर केले जाई. कबड्डी आणि कुस्तीच्या स्पर्धा तर रोमांचक व्हायच्या. पहेलवानांना एक रूमाल आणि एक नारळ भेट दिला जाई. पाटीपुरा सर्वात शिक्षित वस्तीजिल्ह्यात सर्वाधिक पदवीधरांची वस्ती म्हणून यवतमाळातील पाटीपुऱ्याची गणना झाली होती. नगरपरिषदेने केलेल्या एका सर्वेतून ही बाब समोर आली होती. भले ही वस्ती बकाल असेल पण बाबासाहेबांच्या प्रेरणेने इथले अनेक जण उच्च शिक्षित झाल्याचा आनंद टेंभुर्णे यांनी व्यक्त केला. जुन्या काळात हा भाग जिल्ह्यातील क्रांतिस्थळ होता. ‘दिलदार माणसांची दिलदार वस्ती आहे’ या कवितेतून टेंभुर्णे यांनी पाटीपुराबाबतच्या भावना सांगितल्या.