अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणुकांचे वर्ष म्हणून अख्ख्या देशाचे लक्ष २०१९ कडे लागलेले असताना साहित्यिकांनी मात्र याच वर्षात होणाऱ्या संमेलनात चक्क निवडणुकीलाच फाटा दिला. दरवर्षी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना होणारी निवडणूक, त्यातील पातळी सोडणारे वाद टाळून यंदा संमेलनाध्यक्ष एकमताने निवडण्यात आला. मराठी साहित्य विश्वासाठी क्रांतिकारक ठरलेल्या या नव्या पायंड्याची सुरवात रविवारी यवतमाळात झाली, हे विशेष.तब्बल ४६ वर्षांनंतर यवतमाळात ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. याच संमेलनाच्या निमित्ताने साहित्य महामंडळाने तीन क्रांतीकारक बदल आपल्या घटनेत करवून घेतले. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, संमेलनाध्यक्षांची निवडणूक बाद केली. त्याऐवजी घटक संस्थांनी सूचविलेल्या नावांतून एका साहित्यिकाला अध्यक्षपदाचा बहुमान सन्मानानेच बहाल करायचा. तसा तो रविवारी डॉ. अरुणा ढेरे यांना बहाल करण्यात आला. त्यासाठी महामंडळाचे महाराष्ट्रभरातील पदाधिकारी यवतमाळच्या डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्रात जमले होते. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या नावांचा, त्याआडून जाणीवपूर्वक वाढविलेला ताण संपूर्णपणे बाजूला सारुन यावेळी नव्या संमेलनाध्यक्षांची निवड एकमताने जाहीर करण्यात आली.प्रतिक्रियापूर्वी संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत ११०० लोक मत देत होते. त्यातून जिंकणाºया किंवा हरणाºया उमेदवाराचे श्रेय किंवा दोष साहित्य संस्थांवर येत नव्हते. तर तो-तो उमेदवारच विजय किंवा पराजयासाठी जबाबदार ठरत होता. आताही निवडणूकच झाली. पण मत देणारे लोक मर्यादित होते. या निवडीत ज्या मोठ मोठ्या साहित्यिकांना शून्य मत मिळाले, त्याची जबाबदारी त्यांचे नाव सूचविणाºया संस्थांवर येते.- कौतिकराव ठाले पाटील,साहित्य महामंडळाचे सदस्ययवतमाळात संमेलन होत असल्याने अतिशय आनंद झाला. हे संमेलन अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडेल याविषयी विश्वास आहे. अरुणातार्इंच्या नावावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले. त्यासंदर्भात महामंडळाच्या प्रमुखांनी दिलेली माहितीच अंतिम मानावी.- आसाराम लोमटे, साहित्य महामंडळाचे सदस्य------------------------यवतमाळला साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान दिल्याबद्दल साहित्य महामंडळाच्या सर्व पदाधिकाºयांचे आभार मानतो. यवतमाळचे हे संमेलन निश्चितच मराठीचे महत्त्व सातासमुद्रा पार पोहोचवेल. संमेलन भव्य दिव्यच होईल. पण भव्यता केवळ मोठ्या इमारतीत, मंडपात नसते. तर साहित्यिकांच्या शब्दातील भव्यता लक्षात घ्यावी.- मदन येरावार, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री-------------------------संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाºया स्मरणिकेचा अर्धाभाग यवतमाळ जिल्ह्याला वाहिलेला असेल. येथील आदिवासी, गोंड, बंजारा अशा सर्वच संस्कृतीवर त्यात प्रकाश टाकणारे लेखन असेल.- डॉ. रमाकांत कोलतेविदर्भ साहित्य संघाचेकार्यकारिणी सदस्य
यवतमाळचे संमेलन ठरणार साहित्यिक क्रांतीची नांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:22 PM
निवडणुकांचे वर्ष म्हणून अख्ख्या देशाचे लक्ष २०१९ कडे लागलेले असताना साहित्यिकांनी मात्र याच वर्षात होणाऱ्या संमेलनात चक्क निवडणुकीलाच फाटा दिला. दरवर्षी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना होणारी निवडणूक, त्यातील पातळी सोडणारे वाद टाळून यंदा संमेलनाध्यक्ष एकमताने निवडण्यात आला.
ठळक मुद्देसाहित्य संमेलन जानेवारीत कृषक समाजाच्या जीवनावर होणार सारस्वतांचे मंथन, महामंडळाची ग्वाही