रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकेकाळी स्वच्छता अभियानामुळे नावारूपास आलेले यवतमाळ शहर आता अस्वच्छतेच्या नावाने ओळखले जावे इतकी दुर्गंधी आणि अस्वच्छता शहरात पसरली आहे. घंटागाड्या, अद्ययावत वाहने असतानाही नाल्या तुंबलेल्या आहेत. शहराचा आवाका वाढताच स्वच्छतेकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले आहे. स्वच्छता, दिवाबत्ती आणि नाले आणि गटार स्वच्छता या विषयाकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही.यामुळे आजही शहरात जागोजागी नाल्या तुंबलेल्या पहायला मिळतात. शहरातील सखल भागात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. असे असले तरी मुख्याधिकारम आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. यामुळे नगराध्यक्षांनीही आता मुख्याधिकाºयांना पत्र लिहून नाला सफाईच्या कामाबाबत जाब विचारला आहे.सन २०१६ मध्ये नगरपरिषदेच्या लगतच्या आठ ग्रामपंचायती नगरपरिषदेत विलीन करण्यात आल्या. यामध्ये लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, वडगाव, मोहा, भोसा, डोर्ली आणि उमरसरा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायती नगरपरिषदेच्या क्षेत्रात विलीन झाल्याने या भागाचा विकास झपाट्याने होईल असा विश्वास या भागातील नागरिकांना होता. प्रत्यक्षात चार वर्ष लोटले तरी या भागातील प्रश्न मात्र कायम आहे. विशेष म्हणजे शहराच्या स्वच्छतेसंदर्भात दुर्लक्ष झाले आहे. यात नाल्यांची सफाई अग्रक्रमावर आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगरपरिषद क्षेत्रातील नाल्यांची सफाई होणे अपेक्षित होते. मात्र सफाईच्या संदर्भात निविदाच उशिरा उघडण्यात आल्या. आता जून महिना संपत आला तरी स्वच्छतेचे काम कासवगतीने सुरू आहे.शहरातील मुख्य नाल्याच्या स्वच्छतेबाबत प्रचंड ढिसाळ धोरण नगरपरिषदेने अवलंबिले आहे. यामुळे हा नाला विविध भागात तुंबला आहे. यामध्ये थर्माकोल, प्लास्टिकच्या बॉटल्स, प्लास्टिक कप, पिशव्या आणि इतरही साहित्य वाहून आले आहे. नाल्याच्या तोंडावर हा कचरा साचून बसला आहे. यानंतरही तो कचरा बाजूला केला गेला नाही.शहरातील बसस्थानक चौकातून थेट तलावफैलापर्यंत गेलेल्या नाल्यात कचराच कचरा दिसत आहे. नाल्याच्या मूळ क्षमतेच्या दहा टक्के भागच पाण्याची वाट करून देण्यासाठी जेसीबीच्या मदतीने खुला करण्यात आला आहे. नाला खुला करताना काढण्यात आलेला गाळ रस्त्यावर टाकून देण्यात आला आहे. गत तीन-चार दिवसांपासून हा कचरा परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरवित आहे. तर काही भागांमध्ये डांबरीकरण रस्ता नाल्यातील गटाराने भरला आहे. यामुळे या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. एकूणच संपूर्ण स्थिती हाताबाहेर गेली आहे.स्थानिक शिवाजी गार्डन परिसरात पोलिसांचे बॅरेकेटस् नाल्यात वाहून गेले आहे. वाघापूर मार्ग तर चिखलाने माखला आहे. या भागात वाहन घेऊन जाणे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. दररोज डझनावर नागरिक या रस्त्यावर पडतात.अशीच स्थिती संकटमोचन रोडवरील अंतर्गत रस्त्याची अवस्था अशीच बिकट आहे. टेलिफोनसाठी दोन्ही भागात नाल्या खोदण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण रस्ता निम्म्यावरच आला आहे. रात्रीच्या सुमारास या रस्त्यावरून वाहन चालविणे धोक्याचे आहे.नगराध्यक्षांनी दिले मुख्याधिकाऱ्यांना पत्रशहरातील स्वच्छतेबाबत आणि नाल्यांच्या सफाईबाबत होत असलेल्या दुर्लक्षामुळे नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी संतापल्या आहेत. त्यांनी या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. शहराच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंत्राटदार काम करीत नसेल तर त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे, असे मत त्यांनी नोंदविले आहे. आर्थिक वर्षात लाखो रुपयांचा निधी आरक्षित असताना शहराच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्ष झाल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
गटारांच्या बजबजपुरीने यवतमाळकरांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:29 PM
एकेकाळी स्वच्छता अभियानामुळे नावारूपास आलेले यवतमाळ शहर आता अस्वच्छतेच्या नावाने ओळखले जावे इतकी दुर्गंधी आणि अस्वच्छता शहरात पसरली आहे. घंटागाड्या, अद्ययावत वाहने असतानाही नाल्या तुंबलेल्या आहेत. शहराचा आवाका वाढताच स्वच्छतेकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले आहे. स्वच्छता, दिवाबत्ती आणि नाले आणि गटार स्वच्छता या विषयाकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही.
ठळक मुद्देपालिकेला सफाईचा विसर : झोपड्यांत पावसाचे पाणी शिरणार