लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात अत्यंत कमी पाण्यात शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. हाच आदर्श राज्यभरातील शेतकऱ्यांपुढे ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महारेशीम अभियान राबविले जाणार आहे. रेशीम लागवडीसाठी उत्सूक असलेल्या शेतकऱ्यांच्या १९ डिसेंबरपर्यंत नोंदी घेतल्या जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात रेशीम लागवडीवर भर दिला. विशेष मोहिम राबविली, यामुळे लागवड क्षेत्रात मोठी वाढ नोंदविण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी रेशमाची लागवड केली, त्यांचे उत्पन्न वाढण्यास सुरूवात झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याचे लक्षात आल्यानंतर रेशीम संचालनालयाने राज्यात महारेशीम अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जाणीवजागृतीसाठी रेशीमरथ गावोगावी फिरणार आहे.नागपुरातून या अभियानाला सुरूवात झाली. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात रेशीम लागवड वाढविण्यासाठी संचालनालय विशेष प्रयत्न करणार आहे. यवतमाळ, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याण्याचे आदेश रेशीम संचालनालयाने दिले आहे.पिक ाचे सर्वच दृष्टीने संरक्षणरेशीम पीक घेताना शेड उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. या शेडमध्येच रेशीम कोष तयार करणाऱ्या अळ्या ठेवल्या जातात. शेडमुळे सर्वच प्रकारच्या वातावरणात कोषाचे संरक्षण होते. यामुळे आर्थिक हानी टाळता येते. यामुळे हमखास उत्पादन देणार पीक म्हणून रेशीम कोषाकडे पाहिले जाते.
यवतमाळच्या रेशीम शेतीचे मॉडेल राज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:51 PM
जिल्ह्यात अत्यंत कमी पाण्यात शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. हाच आदर्श राज्यभरातील शेतकऱ्यांपुढे ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महारेशीम अभियान राबविले जाणार आहे.
ठळक मुद्दे संचालनालयाचा निर्णयराज्यात महारेशीम अभियान राबविणार