ज्ञानेश्वर मुंदे ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : अचानक डोके दुखायला लागून पाठ आणि मानेत प्रचंड वेदना होत असेल तर तुम्हालाही यवतमाळातील खड्ड्यांनी ‘झटका’ दिला. ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे अनेकांना मनक्याचे आजार जडले आहे. काहींना रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे. या खड्ड्यांचा दुचाकी चालकांनी चांगलाच धसका घेतला असून कोणत्या रस्त्याने जावे असा प्रश्न घरातून निघताना पडतो.शहरात नळ योजनेची पाईपलाईन, रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. प्रत्येक गल्लीबोळातील रस्ते खोदून ठेवले आहेत. बुजविलेल्या खड्ड्याचे गतिरोधक तयार झाले आहे. अशा उंचसखल रस्त्यांवरून जाताना वाहनधारकांना त्यातही दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागते. कोणता रस्ता कुठे खोदला याचा अंदाज येत नाही. परिणामी वाहन त्यातून उसळते आणि मोठा झटका बसतो. वारंवार बसणाºया या झटक्यांमुळे आता अनेकांना मनक्याचे आजार जडले आहे. ज्येष्ठ नागरिकच नाही तर तरुणही अशा आजाराला सामोरे जात आहेत.दुचाकी चालविताना अचानक पाठ लागून येते. काही वेळात मानही लागते. मान वळविताना त्रास होते. प्रचंड वेदना होत डोक दुखायला लागते. काहींचे तर डोक गरगरायला होते. अशी लक्षणे दिसल्यानंतर प्रत्येकजण प्रथम घरगुतीच उपाय करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सततच्या वाहन चालविण्यामुळे हा त्रास वाढत जातो. मग सुरू होते रुग्णालयाची वारी. मनक्याच्या आजाराने त्रस्त रुग्ण शहरातील अस्थिरोग तज्ञांचा शोध घेतात. त्यांना तेथे फिजिओथेरेपिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. अस्थिरोग तज्ञ आणि फिजिओथेरेपिस्टकडे अशा रुग्णांची संख्या वाढल्याचे सध्या दिसत आहे. दुखण्यासोबत आर्थिक फटकाही नागरिकांना सहन करावा लागत आहे.दुचाकी दुरुस्तीचा खर्च वाढलायवतमाळ शहरातील खड्ड्याध्ये वारंवार दुचाकी आदळत असल्याने दुरुस्तीच्या खर्चाचाही भार नगरिकांना सोसावा लागत आहे. अलिकडे पीव्हीसीपासून तयार केलेल्या हलक्या वजनाच्या दुचाकी तर खड्ड्यात आदळून त्यांचे स्पेअरपार्ट तुटत आहेत. शहरातील कोणत्याही मेकॅनिकलकडे जा, तेथे दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांची गर्दी दिसून येते. कुणाली विचारले तर तो थेट शहरातील खड्ड्यांच्या नावे खडे फोडताना दिसतो.शहरातील खड्ड्यांमुळे नादुरुस्त झालेली वाहने दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. यात अनेक वाहनांचे शॉकअप खराब झालेले दिसून येते. इंजीन फाऊंडेशनचे बुश कटून इंजीन पाटा फुटण्याचे प्रकारही वाढले आहे. खड्ड्यांमुळे बेअरिंग जातात, बुश कीट खराब होते. अशा वाहनांना साधारणत: पाचशे ते तीन हजारापर्यंत खर्च येतो. यासोबतच वाहन खिळखिळे होऊन वाहनाचे आयुष्य कमी होते.- आशिक निर्बानमोटरसायकल मेकॅनिकल, यवतमाळ
यवतमाळातील खड्ड्यांनी वाढले मणक्याचे आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 9:43 PM
अचानक डोके दुखायला लागून पाठ आणि मानेत प्रचंड वेदना होत असेल तर तुम्हालाही यवतमाळातील खड्ड्यांनी ‘झटका’ दिला. ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे अनेकांना मनक्याचे आजार जडले आहे.
ठळक मुद्देखोदकामांचा झटका : दुचाकी चालक धास्तावले, अनेकांची धाव रुग्णालयाकडे