शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

यवतमाळ अर्बनचा निकाल अन्य बँकांसाठी धोक्याची घंटा

By admin | Published: January 14, 2016 3:07 AM

संघ-भाजपाच्या शिस्तबद्ध प्रचार मोहिमेत यवतमाळ अर्बन को.आॅप. बँकेचे परंपरागत संचालकांचे पॅनल भूईसपाट झाले.

मतदारांना गृहित धरणे भोवले : एकहाती विजयाने भाजपाच्या मंत्री-आमदारांची प्रतिष्ठा राहिली शाबूतयवतमाळ : संघ-भाजपाच्या शिस्तबद्ध प्रचार मोहिमेत यवतमाळ अर्बन को.आॅप. बँकेचे परंपरागत संचालकांचे पॅनल भूईसपाट झाले. या पॅनलच्या भ्रमाचा भोपळा फुटला. हा निकाल आगामी काळात निवडणूकीला सामोरे जाणाऱ्या अन्य बँकांच्या सत्ताधारी संचालकांसाठी धोक्याचा अलर्ट देणारा ठरला आहे. यवतमाळ अर्बन को.आॅप. बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचे निकाल बुधवारी पहाटे हाती आले. १६ पैकी एक जागा आधीच बिनविरोध झाली होती. उर्वरित १५ पैकी १२ जागांचे निकाल जाहीर झाले. तर तीन जागांचे निकाल उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राखून ठेवण्यात आले आहे. १९ जानेवारीनंतर ते जाहीर केले जातील. या निवडणुकीत गेली कित्येक वर्ष बँकेची धुरा सांभाळणाऱ्या भाऊसाहेब मारोडकर व सुशील कोठारी यांच्या समन्वय पॅनलचा पुरता धुव्वा उडाला. जाहीर झालेल्या सर्व १२ ही जागा मनोहर देव- अजय मुंधडा-आशिष उत्तरवार यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने जिंकल्या. १८०० कोटींच्या ठेवी असलेल्या या बँकेच्या निवडणूक प्रचारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाचे मंत्री, आमदार व वरिष्ठ पदाधिकारी स्वत: उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यामुळेच संपूर्ण विदर्भाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. राज्यात १३३ मतदान केंद्र आणि ७३ हजार ५०० मतदार एवढा मोठा या निवडणुकीचा व्याप होता. मात्र अर्बन बँकेचा हा गड संघ-भाजपाने आपल्याच घरात वाढलेल्या भाऊबंधांना धक्का देऊन सर केला. समन्वय पॅनलचे नेते-संचालक गेल्या कित्येक वर्षांपासून यवतमाळ अर्बन बँकेची धुरा सांभाळत आहे. या काळात त्यांनी हजारोंना मदतीचा हात दिला. अडचणीच्या वेळी शक्य त्या सर्वांना कर्ज स्वरूपात मदत केली. सामाजिक उपक्रमातही हिरीरीने सहभाग घेतला. त्यामुळे या उपकाराची परतफेड म्हणून मतदार पुन्हा आपल्यालाच संधी देतील अशी समन्वयला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांचा अपेक्षा भंग झाला. समन्वयच्या प्रचाराचा प्रचंड गाजावाजा होता. या उलट स्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार पॅनलची होती. शांततेने आणि शिस्तबद्धपणे सहकारचा प्रचार सुरू होता. त्यामुळेच त्यांची बाहेर हवा दिसत नव्हती. या न दिसणाऱ्या प्रचाराची भुरळ पडल्यानेच समन्वयचे नेते एकहाती विजयाचा दावा करीत होते. प्रत्यक्षात निकालानंतर त्याच्या उलटे चित्र पुढे आले. या निकालाने समन्वयच्या नेत्यांना अक्षरश: जमिनीवर आणले. शिवाय मतदार-कर्जदारांना गृहित धरणाऱ्या, विजयाच्या भ्रमात राहणाऱ्या विद्यमान संचालकांसाठी यवतमाळ अर्बन बँकेचा हा निकाल डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. मतदारांनी ‘चेंज’चा नारा दिल्यास निवडणुका होऊ घातलेल्या अन्य बँकांमध्येही यवतमाळ अर्बनची पुनरावृत्ती होऊ शकते. (जिल्हा प्रतिनिधी)