शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

दीड वर्षापासून शिक्षकांच्या जीपीएफचा घोळ

By admin | Published: May 06, 2017 12:21 AM

शिक्षकांच्या वेतनातून कपात केली जाणारी जीपीएफची रक्कम त्यांच्या खात्यात जमाच करण्यात न आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

लेखा विभागावर प्रश्नचिन्ह : लाखोंची कपात पण खात्यात शून्य, पंचायतचा ढिसाळ कारभार स्थानिक प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शिक्षकांच्या वेतनातून कपात केली जाणारी जीपीएफची रक्कम त्यांच्या खात्यात जमाच करण्यात न आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरू असून आता आपल्या रकमांसाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे. शालार्थमधून शिक्षकांचे वेतन अदा केले जाते. त्यामुळे त्यांचा भविष्य निर्वाह निधी, व्यावसाय कर, जिल्हा परिषद गट विमा आदी रकमा आॅनलाईन बिलात कपात केल्या जातात. मात्र, ही रक्कम प्रत्यक्ष त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून दर महिन्याला कपातीचे शेड्यूल जिल्हा परिषदेकडे पाठविणे आवश्यक असते. नेमके हेच काम पंचायत समितीस्तरावरून झालेले नाही. जिल्ह्यातील सोळाही पंचायत समित्यांकडून हा ढिसाळपणा घडलेला आहे. आॅगस्ट २०१५ पासून शिक्षकांचे वेतन आणि कपाती शालार्थमधून आॅनलाईन केले जात आहे. मात्र, कपातीचे शेड्यूल पंचायत समिती स्तरावरून नियमित पाठविले गेले नाही. त्यामुळे आॅगस्ट २०१५ ते एप्रिल २०१७ या दीड वर्षांच्या कालावधीतील कपातीच्या रकमा शिक्षकांच्या खात्यात जमा होऊ शकलेल्या नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने पाठपुरावा केल्यानंतर आता शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. आपल्या कपातीचे किती महिन्यांचे शेड्यूल बाकी आहे, याची चौकशी शिक्षकांनी सुरू केली आहे. शिक्षकांनी स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी शेड्यूलबाबत संबंधित पंचायत समितीस्तरावर पाठपुरावा करण्याचे आवाहन शिक्षक सेनेने केले आहे.