शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

यंदा बारावी निकालाचा टक्का घसरला

By admin | Published: May 26, 2016 12:06 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी घोषित करण्यात आला.

बारावीचा निकाल : वणी-७५.१४, मारेगाव-८२.५६, झरी-८९.१६, तर पांढरकवडा-८३.२२ टक्के निकालवणी/मारेगाव/झरी/पांढरकवडा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल १० ते २० टक्के कमी लागला आहे. विशेष म्हणजे वणी तालुक्यात एकाही महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला नाही. वणी तालुक्यात सर्वात कमी निकाल भास्करराव ताजने कनिष्ठ महाविद्यालय वेळाबाईचा, तर सर्वाधिक निकाल वणी लॉयन्स कनिष्ठ महाविद्यालयचा लागला आहे. वणी तालुक्यातील शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी ७३.२३, शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वणी ८६.९१, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय घोन्सा ७८.३८, पंचशील कनिष्ठ महाविद्यालय नांदेपेरा ७०.३७, श्री गुरूदेव कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर ७२.४४, जिल्हा परिषद ऊर्दू उच्च माध्यमिक विद्यालय वणी ७२.२२, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय वणी ५७.१४, राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय राजूर (कॉलरी) ६०.७१, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय शिंदोला ६२.३०, जगन्नाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालय वांजरी ४५.१६, वणी पब्लिक ज्युनियर कॉलेज वणी ८२.३५, जगन्नाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालय वणी ५०, बालाजी कनिष्ठ महाविद्यालय सावर्ला ९०, लायन्स विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वणी ९४.५९, राजे संभाजी ज्युनियर कॉलेज कायर ८१.५८, महात्मा जोतिबा फुले ज्युनियर कॉलेज कायर ९१.९४, भास्करराव ताजने कनिष्ठ महाविद्यालय वेळाबाई ४०, हाजी शिराजउद्दीन कनिष्ठ महाविद्यालय राजूर (कॉलरी) ७१.४३, भास्करराव ताजने कनिष्ठ महाविद्यालय कळमना ५० टक्के असा निकाल लागला आहे.वणी तालुक्याचा सरासरी निकाल ७५.१४ टक्के लागला. तालुक्यातून १ हजार ९९१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ हजार ४९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. खासगी विद्यार्थ्यांचा निकाल मात्र केवळ २९.८१ टक्के लागला आहे. वणी तालुक्यातून लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीची श्वेता राजेश गौरकार ही ८५.९४ टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. वणी पब्लिक स्कूलची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी तेजस्विनी तेजकुमार परसाराम ही ८४.७७ टक्के गुण ोऊन दुसरी आली आहे. मारेगाव तालुक्यातून नियमित ८३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मारेगाव तालुक्याचा निकाल ८२.५६ टक्के लागला. खासगी विद्यार्थ्यांचा निकाल ४०.५४ टक्के लागला. मारेगाव तालुक्यातील शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे- भारत विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय कुंभा ८३.८७, राष्ट्रीय विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव १००, आर्ट कॉमर्स ज्युनियर कॉलेज मारेगाव ७४.७३, राष्ट्रीय आर्ट ज्युनियर कॉलेज हिवरा-मजरा ६४, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय मार्डी ८७.९३, चोपणे उच्च माध्यमिक विद्यालय बोटोणी ७७.२७, जीवन विकास उच्च माध्यमिक विद्यालय हटवांजरी ७८.२६, विवेकानंद आर्ट ज्युनियर कॉलेज कान्हाळगाव ९१.६७, शासकीय आश्रमशाळा बोटोणी ९५.५२, संकेत ज्युनियर कॉलेज मारेगाव ८३.३३, नेताजी सुभाषचंद्र बोस ज्युनियर कॉलेज म्हैसदोडका ७५, विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज आॅफ सायन्सचा १०० टक्के निकाल लागला आहे. मारेगाव तालुक्यातून विद्यानिकेतक इंग्लिश मीडिअम कनिष्ठ महाविद्यालयाची प्रीती शंकर डुकरे ही ८५.०७ टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. झरी तालुक्यातून ७२९ नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. झरी तालुक्याचा निकाल ८९.१६ टक्के लागला. खासगी विद्यार्थ्यांचा निकाल ३४.०९ टक्के लागला. झरीतील शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे. राजीव कनिष्ठ महाविद्यालय झरीजामणी ८७.७४, राजीव कनिष्ठ महाविद्यालय पाटण ९२.५०, आदर्श हायस्कूल मुकुटबन ८७.५७, शासकीय आश्रमशाळा शिबला ९१.११, सूर्यतेज उच्च माध्यमिक विद्यालय मांडवी ८६.११, सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय बाळापूर ७५, मातोश्री पुनकाबाई आर्ट ज्युनियर कॉलेज मुकुटबन ९९.२२ बालाजी ज्युनियर कॉलेज माथार्जुन ७८.७९, सूर्यतेज विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय झरी ८०.९५ टक्के निकाल लागला आहे.पांढरकवडा तालुक्याचा बारावीचा निकाल ८३.२२ टक्के लागला़ आहे. तालुक्यातील २२ कनिष्ठ महाविद्यालयांतून एक हजार ६०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक हजार ३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ विशेष म्हणजे यावर्षी २२ पैकी एकाही कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला नाही. मागील वर्षी सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्केलागला होता. तालुक्याची निकालाची टक्केवारी ९५.१३ होती. यावर्षी ११.९१ टक्याने निकाल कमी लागला अहे. पांढरकवडा तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयनिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे़ जिल्हा परिषद (माजी शासकीय) कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा ९१.१६, बा़दे़पारवेकर कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा ८४.९४, शिवछत्रपती कनिष्ठ महाविद्यालय पाटणबोरी ८०.७०, के.ई.एस. कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा ६६.६७, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय करंजी ५५.०७, विकास हिन्दी कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा ८२.५०, जनता कनिष्ठ महाविद्यालय पाटणबोरी ७६.४७, नेताजी कनिष्ठ महाविद्यालय मोहदा ७५.४१, राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा ९८.९६, स्वक़ृष्णराव ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय बोथ ७२.९७, संकल्प कनिष्ठ महाविद्यालय उमरी ९२.३१, शिवरामजी मोघे कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा ७८.८७, आबासाहेब पारवेकर कनिष्ठ महाविद्यालय रूंझा ८१.५८, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय पहापळ ६८.५७, जनसेवा कनिष्ठ महाविद्यालय उमरी ८५.७१, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय खैरगाव (देशमुख) ९५, राजारावजी बोडगेवार कनिष्ठ महाविद्यालय पाटणबोरी ९७.९२, संकल्प कनिष्ठ महाविद्यालय कोंघारा ७७.२७, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मोहदा ७४.७०, सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय वाई ९४.५९, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय भाडउमरी ७५.५६ आणि गाडगे महाराज उच्च माध्यमिक आश्रमशाळा उमरीचा (रोड) ८८.५७ टक्के निकाल लागला आहे. पांढरकवडा तालुक्यातून येथील बाबासाहेब देशमुख पारवेकर कनिष्ठ महाविद्यालयातील वाणीज्या शाखेचा विद्यार्थी संजीत संजय पुरी हा ८९.३८ टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे. येथीलच जिल्हा परिषद (माजी शासकीय) कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी आशुतोष आत्राम हा ८५.३३ टक्के गुण घेऊन तालुक्यातून दुसरा आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)