ऑनलाईन लोकमतयवतमाळ : हुकूमशाही लादण्यासाठी सिरियात निष्पाप नागरिकांचा नरसंहार होत आहे. भारताने या प्रकाराविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघात कठोर भूमिका घेण्याची मागणी करीत येथे मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी आक्रोश केला. सिरियातील अत्याचारांचा भारताने निषेध नोंदविण्यासाठी मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. स्थानिक कळंब चौकातून निघालेला मोर्चा तिरंगा चौकात पोहोचल्यावर जाहीर सभा झाली. गत काही महिन्यांपासून सिरियामध्ये गृहयुद्ध सुरू आहे. बशरूल हसद हा राज्यकर्ता रशिया आणि इस्राईल या देशांच्या मदतीने सिरियामध्ये हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या बाबीला सिरियातील नागरिकांनी विरोध केला आहे. यामुळे सिरियावर बॉम्ब हल्ले करण्यात आले. हा भूभाग ओस पडला आहे. हजारो नागरिकांचा जीव गेला. त्यांची संपत्ती नष्ट झाली.सिरियामध्ये मानव अधिकाराचे उल्लंघन झाले आहे. महिला आणि बालकांची हत्या झाली आहे. या परिस्थितीकडे जगातले बलाढ्य देश केवळ बघ्याची भूमिका घेऊन पाहात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.इस्राईलने नुकतीच ग्रेटर इस्राईल या देशाची संकल्पना मांडली. या संकल्पनेतून येरूसलेमला राजधानी म्हणून घोषणा केली. या घटनेचा भारताने निषेध नोंदविला आहे. त्याचप्रमाणे सिरियाच्या नरसंहाराविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रसंघाकडे निषेध नोंदवावा. तेथील नागरिकांवरील हल्ले थांबविण्यासाठी ठोस पावले उचलावी. कॅनडा, तुर्कीप्रमाणे भारतात सिरियाच्या नागरिकांना आश्रय देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी अॅड. इमरान देशमुख, अॅड. मीन मुख्तान अहेमद, रियाझ लोहाना, फशिष खान, निजामुद्दीन काझी यांनी निवेदन सादर केले.
सिरियातील संहाराविरुद्ध यवतमाळात जनआक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:12 PM
हुकूमशाही लादण्यासाठी सिरियात निष्पाप नागरिकांचा नरसंहार होत आहे. भारताने या प्रकाराविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघात कठोर भूमिका घेण्याची मागणी करीत येथे मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी आक्रोश केला.
ठळक मुद्देकठोर भूमिका घ्या : मुस्लिम बांधवांचे साकडे