शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

येळाबारा मंदिरात भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:30 PM

घाटंजी येथून अवघ्या दोन मैलावर असलेले येळाबारा गाव. प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर असल्याने ठिकठिकाणचे भाविक आणि पर्यटकांचा लोंढा आपसुकच या गावाकडे वळतो. विशेष म्हणजे, सुस्थितीत हे मंदिर उभे आहे.

ठळक मुद्देपहिला श्रावण सोमवार : घाटंजी पंचक्रोशीतील प्रसिद्ध हेमाडपंथी देवस्थान

चंद्रमणी कवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयेळाबारा : घाटंजी येथून अवघ्या दोन मैलावर असलेले येळाबारा गाव. प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर असल्याने ठिकठिकाणचे भाविक आणि पर्यटकांचा लोंढा आपसुकच या गावाकडे वळतो. विशेष म्हणजे, सुस्थितीत हे मंदिर उभे आहे.वाघाडी नदीच्या तीरावर वसलेल्या या मंदिराच्या सभोवताल हिरवीगार वृक्षवेली आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. मंदिरात जाण्यासाठी पक्का रस्ता असून तो यवतमाळ-घाटंजी रोडला जोडला गेला आहे. सध्या पुरातत्व विभागाने हे मंदिर आपल्या अखत्यारित घेतले आहे. याच विभागाचा एक कर्मचारी त्याची देखरेख करतो आहे.श्रावण महिन्यात शिव मंदिरात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हे मंदिर पूर्णत: दगडी चिऱ्यांनी बांधलेले आहे. मंदिराच्या दर्शनी भागात नंदीबैल ऐटीत बसून आहे, तर गाभाºयात शिवलिंग आहे. गाभाºयातून भुयारी मार्ग असल्याचे जुने जाणकार सांगतात. परंतु आता तो भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. या मंदिराच्या पूर्वेकडून गवानखडी, तर पश्चिमेकडून वाघाडी नदी वाहात आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.बारा मारोतीचे शीव जोडलेले गावयेळाबारा गावची ओळख शिवेने होते. बारा मारोतीच्या शीव या गावाला जोडल्या असल्याचे सांगितले जाते. यावरूनच या गावाचे नाव येळाबारा पडले असल्याचे जुने जाणकार सांगतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी याठिकाणी भाविकांची गर्दी असते.