ठळक मुद्देग्रामस्थांना दिलासा : पहिल्या पावसातच पुलावरून वाहतूक सुरू
लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यातील वाघाडी नदीवर येळाबारा येथे ब्रिटिशकालीन पूल होता. या पुलाची उंची कमी असल्याने ग्रामस्थांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पाऊस झाल्यानंतर नदीच्या पुराचे पाणी नेहमीच पुलावरून जात होते. ही अडचण ओळखून येथे अगदी ९० दिवसात उंच पूल बांधण्यात आला.या पुलाच्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री मदन येरावार उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजित वेळेपेक्षा कमी कालावधीत घाटंजी व यवतमाळ तालुक्यातील ग्रामस्थांना पूल बांधून दिला. या पुलावर अडीच कोटी रुपये खर्च झाले. वेळेत काम करणारा कंत्राटदार संदीप नघाटे आणि उपअभियंता व शाखा अभियंता यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. ग्रामस्थांना या पुलामुळे दिलासा मिळाला आहे.