३७ ठिकाणी वर्ग : लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची हजेरी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने शहरात एकाच वेळी १५ हजार साधकांनी योगा केला. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यक्रमासह विविध ३७ केंद्रावर योग दिन पार पडला. यावेळी पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेठिये आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री मदन येरावार यांनी साधकांना संबोधित केले. शरीरासोबत मनाचे स्वास्थ्य लाभावे म्हणून योगासन महत्वाचे असल्याची बाब त्यांनी साधकांपुढे व्यक्त केली. योगामुळे विचारातही सकारात्मक परिणाम होतो, असे ते म्हणाले. शहरात जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी, नगरपरिषद, पंतजली योग समिती, आर्ट आॅफ लिव्हिंग, जनार्धन स्वामी योगाभ्यास मंडळ, शारीरिक शिक्षक संघटनांसह विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून योगदिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यालयात पतंजली योग समितीचे योग शिक्षक दिनेश राठोड, माया चव्हाण, आर्ट आॅफ लिव्हींगचे योग शिक्षक डॉ. प्रमोद यादगिरवार, सुनंदा गवळी आदींनी योगाचे धडे दिले. आंतरराष्ट्रीय योगपटू श्रध्दा मुंधडा हिने योगासनाचे विशेष सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संयोजक आर्ट आॅफ लिव्हींगचे शंतनू शेटे होते. योग शिक्षक संजय चाफले, महेश जोशी, ज्ञानेश्वर सुरजुसे, मनिष दुबे, दामोधर ठाकरे, प्रभाकर डेहणकर, प्रा. पंडित वारंगे, उत्तम चंदनकर, सतीश उपरे, विद्या ब्राम्हणकर, विद्या गौरकार, सुनीता गाढवे, संजय सांबारे, माया चंदनकर, सतीश त्रिवेदी, हर्षा मोरे, संजय ईश्वरकर, अस्मिता राठोड, अनिकेत राठोड, वंदना सांबारे, गजानन तनमने, डॉ. कविता बोरकर, डॉ.विजय चाफले, भावना बैस, बबनराव ठाकरे, बापू चवर्ले, संदीप खांदवे, प्रकाश चिव्हाने, वर्षा पडवे, साक्षी चिव्हाने, रंजना बन, सपना बन, सुदेश राठोड, सुमती खंडारे, शशांक खांडेकर, दर्शना शिवनकर आदींनी ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमात योगाचे धडे दिले.
१५ हजार साधकांचा योगाभ्यास
By admin | Published: June 22, 2017 12:59 AM