वाढत्या रुग्ण व मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडत आहे. खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिल आकारात आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. ते उपचारविनाच घरीच आजार अंगावर काढत आहेत. त्यात त्यांचा मृत्यू होत आहे. अशा स्थितीत डॉ. अमोल खांदवे यांनी या आजारात नाक, गळा, श्वसन नलिका व फुफ्फुस यामध्ये मुख्यतः होणारे संक्रमण रोखण्यासाठी आयुर्वेदातील नस्य चिकित्सा पद्धती अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
जलनेती या शुद्धी क्रियेद्वारे कोमट पाण्यातून ड्रॉप्स, मिश्रण हे पाच भौतिक पद्धतीने तयार केलेले औषधी थेंब टाकून संपूर्ण श्वसन तंत्राचे शोधन या बहुुपयोगी जलनेती पद्धतीने करून फुफ्फुसापर्यंत जाणारे संक्रमण तेथे पोहोचण्यापूर्वीच संशोधित करता येते. या चिकित्सेने संपूर्ण श्वसन तंत्राचे शोधन होऊन दूषित संसर्ग व कफ पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे रोग्यांनी घाबरून न जाता ही चिकित्सा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
अत्यंत स्वस्त अशी ही चिकित्सा असून, रुग्णालयात भरती असलेले रुग्णसुद्धा घेत असलेल्या उपचारासोबत ही चिकित्सा करू शकतात, असे त्यांनी सांगितले. गरीब रुग्णांना ही चिकित्सा आपण मोफत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. संक्रमित रुग्णाकरिता डॉ. खांदवे यांनी संशोधित संजीवनी रसायन व संजीवनी काढा तयार स्वरूपात निःशुल्क उपलब्ध करून दिला आहे. संक्रमित रुग्णांकरिता उपयोगात येईल, अशी पांचभौतिक संजीवन किट व आर्थिकदृष्ट्या औषधोपचार करण्यास अक्षम रुग्णांकरिता निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे. योग व आयुर्वेदमुळे आपण सर्व रोग व संसर्गापासून मुक्त होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.