यवतमाळ : जिल्हा कारागृह यवतमाळ येथील कैदी बांधवांना त्यांच्या शारीरिक विकासासोबतच मानसिक व नैतिक विकासासाठी योग व प्राणायामाचे महत्त्व शास्त्रीयदृष्टिकोनातून पटवून देण्यासाठी पतंजली योगपीठ हरिद्वारअंतर्गत प्रशिक्षित पतंजली योग समिती व युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय योग संस्कार शिबिर घेण्यात आले. कैदी बांधवांच्या विविध मानसिकतेवर सर्वोत्तम उपाय म्हणून योगाची प्रक्रिया व तिचा अभ्यास निश्चितच उपयुक्त ठरेल यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कारागृहामध्ये योगाचे धडे देण्याचे भारत सरकारने ठरविले आहे. त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पतंजली योग समितीचे दामोधर ठाकरे, तायवाडे, सुबोध राय, डगवार, राजेंद्र कठाळे, सतीश उपरे, गजानन टनमने, पंकज चिपडे या योग शिक्षकांनी कैदी बांधवांना योगाचे धडे दिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दिनेश राठोड, पतंजली योग समितीचे अध्यक्ष संजय चाफले, जिल्हा महिला प्रभारी माया चव्हाण, पांडुरंग पवार, सागर बाहेकर व जिल्हा कारागृह प्रशासन आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
जिल्हा कारागृहात योग शिबिर
By admin | Published: February 20, 2017 1:29 AM