लोकमत न्यूज नेटवर्कसवना : भरधाव इंडिका व्हिस्टा कारने आॅटोरिक्षाला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेसह दोन जण ठार झाले. तर आॅटोरिक्षा चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात पुसद-महागाव मार्गावरील सवना येथे बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडला. घरुन रागाने निघून गेलेल्या मुलाला शोधून परत येत असताना हा अपघात झाला.सुमन गिरीधारी येटेवार (५५), रवी परशुराम बेलखेडे (२५) दोघे रा. सवना अशी मृतांची नावे आहे. तर आॅटोरिक्षा चालक धम्मपाल दत्तराव खाडे (२६) रा. सवना हा गंभीर जखमी झाला. सुमन येटेवार यांचा मुलगा शिवाजी कुरबूर झाल्याने घरुन बुधवारी रात्री ९ वाजता निघून गेला होता. त्याला शोधण्यासाठी सुमन आणि गावातील काही तरुण आॅटोरिक्षा क्र.एम.एच.२९-व्ही-७५१४ ने महागाव येथे गेले होते. त्याचा शोध घेऊन परत येत असताना सवना आरोग्य केंद्राजवळील वळणावर पुसदकडून येणाऱ्या इंडिका व्हिस्टा कारने (क्र.एम.एच.२६-एके-००५७) आॅटोरिक्षाला जबर धडक दिली. त्यात सुमन जागीच ठार झाली. तर रवी गंभीर जखमी झाला. त्याला सवनाच्या आरोग्य केंद्रात व तेथून उपचारासाठी पुसद येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. आॅटोरिक्षा चालक धम्मपाल खाडे याला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात इंडिका व्हिस्टा चालक दिलीप भाऊराव राठोड रा.बिटरगाव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. सदर कार फुलसावंगी येथील सुरेश आडे यांच्या मालकीची होती. अधिक तपास महागावचे पोलीस उपनिरीक्षक सतीश दोनकलवार करीत आहे. मृत सुमनच्या मागे तीन मुले, सुना, नातवंड आहे. तर रवीच्या मागे आई, वडील, बहीण, भाऊ आहेत.सवनात आठवडाभरात चौघांचा अपघाती मृत्यूमहागाव तालुक्यातील सवना येथे आठवडाभरात अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याने गाव हादरुन गेले आहे. ३० एप्रिलच्या रात्री स्वीफ्ट डिझायर कारला अपघात होऊन शेख वसीम शेख यासीन (१८) आणि वसीम खान गुलशेख खान पठाण (१८) हे दोघे जण ठार झाले होते. या अपघातातून गाव सावरत नाही तोच बुधवारी रात्री पुन्हा सुमन येटेवार आणि रवी बेलखेडे या दोघांचा मृत्यू झाला.
अपघातात महिलेसह तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 9:25 PM
भरधाव इंडिका व्हिस्टा कारने आॅटोरिक्षाला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेसह दोन जण ठार झाले. तर आॅटोरिक्षा चालक गंभीर जखमी झाला.
ठळक मुद्देसवना येथे अपघात : इंडिका व्हिस्टाची आॅटोरिक्षाला धडक, एक जण गंभीर