शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

पिवरडोल येथे वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू, मृतदेहाजवळ वाघाचा सहा तास ठिय्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 6:28 PM

Tiger Attack: या घटनेने परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत पसरली आहे. व्याघ्र हल्ल्याच्या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून जोपर्यंत ‌वाघाला जेरबंद करीत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.

यवतमाळ - पाटणबोरी येथून जवळच असलेल्या पिवरडोल येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गावालगत शौचास गेलेल्या एका युवकावर वाघानेहल्ला करून त्याला ठार मारले. ही घटना शनिवारी सकाळी ५ वाजता उघडकीस आली. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशतपसरली आहे. व्याघ्र हल्ल्याच्या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून जोपर्यंत ‌वाघाला जेरबंद करीत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणारनाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी २ वाजेपर्यंत युवकाचा मृतदेह घटनास्थळीच पडूनहोता. घटनास्थळी पोलिसांचा ताफा व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र सायंकाळपर्यंत त्यात यश आले नव्हते. (A young man was killed in a tiger attack at Pivardol)

अविनाश पवन लेनगुरे (१८) मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री तो गावालगत शौचासाठी गेला असता, झुडूपात दडी मारून बसलेल्यावाघाने त्याच्यावर झडप घातली. त्यानंतर त्याला अशोक प्रधान यांच्या शेतात फरफटत नेले. या वाघाने रात्रभर झुडपातच अ‌विनाशच्यामृतदेहाजव‌ळ ठिय्या मांडला. अ‌‌विनाश पहाटेपर्यंत घरी न आल्याने त्याचा कुटुंबियांकडून शोध घेण्यात आला. तेव्हा, पहाटे ५ वाजता,घटनास्थळी पाण्याचे टमरेल, मोबाईल व रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. ही बाब गावात वाऱ्यासारखी पसरताच,हजारो गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शोध घेतला असता, अशोक प्रधान यांच्या शेतातील एका झुडूपात वाघ बसून असलेला दिसूनआला. त्याच्या शेजारीच अविनाशचा मृतदेह पडून होता. त्यामुळे गावकऱ्यांनी वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पहाटे ५वाजतापासून १०.३० वाजेपर्यंत तब्बल साडेपाच तास वाघ मृतदेहाशेजारी ठिय्या देऊन होता. त्यानंतर त्याला हुसकावून लावण्यात यश आले.

वाघाला पाहण्यासाठी पाटणबोरी, मांडवी, पिवरडाेल, गवारा परिसरातील नागरिक हजारोच्या संख्येने गर्दी केली. बॉक्स: पिवरडोल परिसरातपाच वाघांचा वावर झरी तालुक्यातील मांडवी बीटाअंतर्गत येणाऱ्या पिवरडाेल परिसरात पाच वाघांचे अस्तित्व आहे. यामध्ये एक वाघिण व चार बछड्यांचा समावेश आहे. हा हल्ला ‘रंगीला’ नामक बछड्याने केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी घटनास्थळावर आमदार संजीवरेड्डी बाेदकुरवार, वणीचेउपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुुज्जलवार, पाटणच्या ठाणेदार संगीता हेलाेंडे, मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने आदींनी भेट दिली. मृतअविनाशचा शेतीवर उदरनिर्वाह असून आई-वडिलांचा एकुलता एक आधार होता. त्याला एक बहीण आहे. कुटुंबाचा आधार गेल्यानेअविनाशचे कुटुंब हादरून गेले आहे. मृताच्या कुटुंबाला तातडीने ५० लाख रूपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केलीआहे.

टॅग्स :Tigerवाघ