झरी तहसीलसमोर युवक काँग्रेसचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:27 AM2019-01-09T00:27:17+5:302019-01-09T00:29:14+5:30
तालुका युवक काँग्रेस कमेटीच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमो बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
झरी : तालुका युवक काँग्रेस कमेटीच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमो बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.
बाजार समितीत सन २०१७-१८ मध्ये हमाली केलेल्या हमालाचे हमाली शासनाकडे शिल्लक असून ती देण्यात यावी, नाफेडअंतर्गत चणा, तूर, सोयाबीनची खरेदी करण्यात आली त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे देण्यात आले नाही. यावर्षी सोयाबीन खरेदी करण्यात आली व आजरोजी दीड महिना होऊनसुद्धा शेतकºयांनी विकलेल्या मालाचे पैसे मिळाले नसून पैसे लवकरात लवकर देण्यात यावे, मुकूटबन येथील एम.पी.बिर्ला कंपनीत तालुक्यातील बेरोजगारांना नोकरी देण्यात यावी, बाहेरील युवकांना प्राधान्य देण्यात येऊ नये, या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे. उपोषणात संदीप बुर्रेवार, निलेशरेड्डी येल्टीवार, अरुण एनगंटीवार, हरिदास गुर्जलवार, राहुल धांडेकर आदी सहभागी झाले होते.