घाटंजी येथे युवक काँग्रेसचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 09:40 PM2018-03-11T21:40:53+5:302018-03-11T21:40:53+5:30
तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँगे्रस कमिटी, तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या पुढाकारात येथे युवकांचा मेळावा घेण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
घाटंजी : तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँगे्रस कमिटी, तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या पुढाकारात येथे युवकांचा मेळावा घेण्यात आला.
मेळाव्याला माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी संबोधित केले. केंद्र सरकार केवळ आश्वासने देत आहे. नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचा विसर सरकारला पडला. १५ लाख तर सोडा २५ हजार लोकांनाही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. शासकीय आणि खासगी नोकºयांचे प्रमाण कमी झाल्याने बेरोजगारांचा प्रश्न वाढत चालला आहे. याला सत्ताधारी जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनीही मार्गदर्शन केले. या सरकारच्या काळात जातीयवाद व धर्मवाद वाढला आहे. देशाच्या हिताचे कुठलेही निर्णय या सरकारने घेतलेले नाही, असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा महिली काँग्रेस अध्यक्ष माधुरीताई अराठे, जितेंद्र मोघे, मारोतराव पवार, अनिल आडे, विष्णू राठोड, सुनील भारती, सिकंदर शहा, श्रीनिवास नालमवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संचालन गणेश मुद्दलवार यांनी, तर आभार राजू निकोडे यांनी मानले. मेळाव्यासाठी तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष मयूरी मनोज मेश्राम, शोभा ठाकरे, विद्या सलाम, डॉ. विजय कडू, मारोतराव पवार, इकलाख खान, माणिकराव मेश्राम, किशोर दावडा, सुभाष गोडे, नगरसेवक परेश कारिया, मुरलीचे सरपंच राजू चौधरी, सरपंच मनोज मेश्राम, अनिल राठोड, अनिल बावने, प्रमोद राठोड, गणेश उन्नरकर, बबलू राठोड, राजेश निकोडे, राजू मुनेश्वर, विनोद मुनगीनवार, अमृत पेंदोर, राम बाजपेयी, वामन अवधुतकार, बालाजी पोटपेल्लीवार आदींनी पुढाकार घेतला.
जनआक्रोश मोर्चा
युवक काँग्रेसच्यावतीने घाटंजी येथे जनआक्रोश मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, विधिमंडळात जाहीर केल्याप्रमाणे बोंडअळीग्रस्तांना कुठलेही निकष न लावता योग्य मोबदला द्यावा, निराधार, वृद्धापकाळ व संजय गांधी योजनांच्या लाभार्थ्यांना वाढ करून योग्यवेळी मानधन वाटप करावे, मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची कामे त्वरित सुरू करावी, पाणी टंचाई उपाययोजना तत्काळ हाती घ्याव्या, नळ योजनेची वीज तोडणे थांबवावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.