रास्ता रोको : राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्पआॅनलाईन लोकमतपाटणबोरी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह पाटणबोरी येथील मुख्य रस्त्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने सोमवारी पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तासभर ठिय्या दिल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दीड वर्षापूर्वी पाटणबोरी येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. परंतु अद्यापपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही. चार महिन्यापूर्वी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दोन महिन्यात कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही अद्यापपर्यंत काम सुरूच झाले नाही. त्यामुळे युवक काँग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले. तसेच पांढरकवडा तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक लाभ देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलन स्थळी धाव घेतली. या आंदोलनाचे नेतृत्व आर्णी-केळापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिनूअण्णा नालमवार यांनी केले. यावेळी उपसरपंच अनिल पुलोजवार, युनुस गोरी, रमेश गटलेवार, प्रमोद तोटावार, हाफीज जाटू, दीपक खुपार, भाऊ वहिले, प्रफुल्ल कैलासवार, दया सिडाम, चिन्य्या मिरलवार, श्रीकांत बोडेवार, गजू राजूलवार, संतोष जंगीवार, संतोष बावणे आदी उपस्थित होते.
पाटणबोरीत युवक काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 11:06 PM