अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुंबईच्या रुपेरी नगरीत सर्वांनाच थारा मिळेल असे नाही. पण मग खेड्यापाड्यात काय कलावंत नाहीत? वाट्टेल तेवढे आहेत! फक्त त्यांना दालन उपलब्ध नाही. पण ज्यांच्या मनात जिज्ञासा आणि जिगिषा आहे, ते स्वर्ग शोधत नाही, पायाखालच्या जमिनीलाच स्वर्ग बनवतात. घाटंजीतल्या तरुणांनी तेच केले! या छोट्याशा तालुक्यातील तरुणांनी एकत्र येऊन स्वत:च्याच परिसरात चक्क सिनेमा साकारला. विशेष म्हणजे, तो यू-ट्यूबवर प्रदर्शित करून केवळ सहा दिवसात अडीच हजार प्रेक्षकही मिळविले!या चित्रपटाची कहाणी म्हणजे भयकथा असली, तरी चित्रपट निर्मितीची कहाणी प्रेरक आहे. शिक्षण आटोपून छोटा-मोठा रोजगार करणारी तरुण मुले एकत्र आली. एकाने कॅमेरा आणला, दुसऱ्याने कथा लिहिली. सर्वांनी एकत्र बसून स्वत:च स्वत:ला प्रशिक्षण दिले. खर्चाचा ताळेबंद मांडला अन् राधे आर्ट लाईन स्टुडिओच्या माध्यमातून सुरू केले चित्रीकरण. त्यातूनच ‘शापित वाडा’ सिनेमा साकारला. चार मित्रांची ही कथा आहे. ते सहलीला जातात अन् एका रहस्यमय गोष्टीचा शोध घेतात. पण शोध त्यांच्या जीवावर बेतून रोमांचक घडामोडी घडतात. कथानकात रहस्य शोधणाºया या मित्रांना चित्रपटाच्या निर्मितीतून स्वत:तील क्षमतेचाही शोध लागला आहे.येथे झाले चित्रीकरणमुख्य चित्रीकरण स्थळ म्हणून शिरोली येथील इंगळे पाटील यांचा वाडा, तळघराचे चित्रीकरण मुरली येथील आदित्य निकम यांच्या घरी यासह कान्होबा टेकडी, येळाबारा धरण, कारेगाव यावली, घाटंजी, निरंजन माहूर, जोडमोहा हायवे, रायसा येथील हनुमान मंदिरात ‘शूट’ झाले.‘शापित वाडा’चे हिरोसुदर्शन रामभाऊ रुईकर (दिग्दर्शन), अजिंक्य रुईकर (कॅमेरा, एडिटिंग) तर कलावंत सुमित ठाकरे, राहुल करपे, सुदर्शन रुईकर, पवन ढाडसे, प्रफुल्ल कावळे, गजानन डंभारे, राजू इंगोले, पंकज रुईकर, बाबा कवासे, मिलिंद लिंगायत, अजू शेख, महेश वखरे, धिरज मुथ्था, रोहीत करपे.कोल्हापूर, पुणे, नांदेड अशा ठिकाणीही आता तरुणांचे स्वत:चे चित्रपट निर्मितीचे बॅनर आहे. मग घाटंजीतच का नको? म्हणून आम्ही प्रयत्न केला. यूट्यूबवर हजारो लोक आमचा सिनेमा पाहात आहेत. तेच आमचे बक्षीस.- सुदर्शन रुईकर, दिग्दर्शक
घाटंजीच्या तरुणांनी साकारला सिनेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:00 PM
मुंबईच्या रुपेरी नगरीत सर्वांनाच थारा मिळेल असे नाही. पण मग खेड्यापाड्यात काय कलावंत नाहीत? वाट्टेल तेवढे आहेत! फक्त त्यांना दालन उपलब्ध नाही. पण ज्यांच्या मनात जिज्ञासा आणि जिगिषा आहे, ते स्वर्ग शोधत नाही, पायाखालच्या जमिनीलाच स्वर्ग बनवतात.
ठळक मुद्देशापित वाडा : केवळ सहा दिवसात अडीच हजार प्रेक्षकांपर्यंत मजल