लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. येथील यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा केतन बाहेती हिने जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावत विदर्भातील ‘टॉपर’ विद्यार्थ्यांमध्येही स्थान मिळविले. ९८.६० टक्के गुण घेणाऱ्या ऋतुजाने आता डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे एक पाऊल टाकले आहे.सीबीएसईतर्फे मार्च महिन्यात दहावीची परीक्षा पार पडली. यात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. विशेषत: यवतमाळ पब्लिक स्कूलने (वायपीएस) दरवर्षी प्रमाणे यंदाही १०० टक्के यशाची परंपरा कायम राखण्यात यश मिळविले. वायपीएसमधून १३० विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी तब्बल १२० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकावली आहे. तर ३५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत यश मिळविले. ९८.६० टक्के गुण मिळवित विदर्भात अव्वल आलेली ऋतुजा ही येथील केतन व डॉ. अपर्णा बाहेती यांची कन्या आहे. तिला गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले हे विशेष. वायपीएसच्याच आर्यन पालडीवाल या विद्यार्थ्याने ९८ टक्के घेत दुसरे स्थान पटकावले, तर श्रेया बाजोरिया हिने ९७.६ टक्के गुणांसह तिसरा, तसेच श्रीमय दीक्षित याने ९७.६० टक्के गुणांसह चौथा क्रमांक मिळविला. यवतमाळ पब्लिक स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी केले. तर प्राचार्य डॉ.जेकब दास यांनी विद्यार्थी व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.केतन बाहेती म्हणतात, ऋतुजा आहे ‘आॅल राउंडर’जिल्ह्यातून आणि विदर्भातून अव्वल ठरलेली यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा बाहेती हिची अभ्यासाची पद्धती अगदी तणावमुक्त आहे. तिचे वडील केतन बाहेती ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, तिने अगदी नॉर्मल राहून अभ्यास केला. मात्र, खरे म्हणजे ऋतुजा आॅलराउंडर आहे. नृत्य, संगीत, खेळ यातही तिला अभ्यासाइतकीच रूची आहे. ती जर विदर्भातून पहिली असेल तर हा ‘गेम आॅफ लक’ आहे. एखादा गुण इकडे तिकडे झाला तर टॉपर बदलतो. पण टॉपरपेक्षा स्वत:वर विश्वास ठेवून अभ्यास करणे हेच खरे यश आहे.जवाहर नवोदय विद्यालय, बेलोराबेलोरा (ता. घाटंजी) येथील जवाहर नवोदय विद्यालयातून ७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते सर्वच उत्तीर्ण झाले. १७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली. ४० जण प्राविण्य श्रेणीत, तर १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. हिमांशू पराशर सरकाटे ९७.२० टक्के गुणांसह शाळेतून पहिला आला. भूषण सुरेश राठोड ९६.६० दुसरा, अभिषेक संजय गावंडे ९५ टक्केसह तिसºया क्रमांकावर आला. तर प्रवाह सागर ठमके याने गणितात १०० पैकी १०० गुण मिळविले. प्राचार्य गंगाराम सिंह, समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांनी श्रेय दिले.पोदार इंटरनॅशनल स्कूल, यवतमाळयवतमाळ येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. एकूण ७६ पैकी १० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. तर १३ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. परिमल जयकुमार कोठारी याने ९७.२० टक्के गुणांसह शाळेतून अव्वल स्थान पटकावले. तर श्रीधर अनिल वैद्य ९६ टक्के गुणांसह दुसरा आणि सुयोग किशोर बोरगावकर ९५.२० टक्क्यांसह तिसरा ठरला. मानस मंगेश देशपांडे ९४.४०, पंकज लक्ष्मण राठोड ९२.४०, सर्वेश रमेश लवंगे ९२.४०, ईश्वरी संजय राठोड ९०.८०, अमेय अरुणकुमार अग्रवाल ९०.६०, ओजल कुलदीप कांबळे ९०, प्रांजल राहुल साबू ९० टक्के गुणांसह यशस्वी झाले.स्कूल आॅफ स्कॉलर्स, यवतमाळस्कूल आॅफ स्कॉलर्सचाही निकाल १०० टक्के लागला. येथून २०६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. जान्हवी सूरज राठोड आणि आर्या विरेंद्र सोनटक्के या दोन विद्यार्थिनी ९७.८० टक्के गुणांसह शाळेत अव्वल ठरल्या. अक्षित अमित मोर ९७.४०, राम मुकेशकुमार मानधना ९७.२०, निखिला भालचंद्र कविश्वर ९७.२०, रिया संजय बजाज ९७, वेणू गोपाल बांगड ९६.५० टक्के गुणांसह यशस्वी झाले. यातील ४० विद्यार्थ्यांनी एवन रँक मिळविली आहे. केंद्रीय विद्यालयातून यंदा दहावीच्या परीक्षेला ३६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेचा निकाल ९४.४ टक्के लागला आहे.गुरुकुल इंग्लीश स्कूल, पांढरकवडापांढरकवडा येथील गुरुकुल इंग्लीश स्कूलमधून दहावीच्या परीक्षेला बसलेले २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सलग चौथ्या वर्षी या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक तर उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. समीक्षा यादवराव बिडकर या विद्यार्थिनीने ९४ टक्के गुणांसह शाळेतून पहिला क्रमांक मिळविला. उत्कर्ष विजय ठाकरे ९३.२, प्रेरणा मनोज बाजोरिया ९३, स्नेहा नवनित तालगोकुलवार ९१.४०, वेदांत विलास तोटावार ९१.४, आशुतोष विजय टापरे ९०.६०, तर समृद्धी गजानन खैरकार ९० टक्के आदी विद्यार्थ्यांनी यश मिळविले. सचिव नरेंद्र नार्लावार, प्राचार्य विजय देशपांडे, उपप्राचार्य स्वप्नील कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, वणीवणी येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागाल आहे. या परीक्षेला एकूण ९६ विद्यार्थी बसले होते. आशिष झोडे, चेतन चिंचुलकर व सारा छाजेड यांनी ९६.४ टक्के गुण प्राप्त करून संयुक्तरित्या प्रथम आले, तर शिवदर्शन मदान (९२.२) व ऋत्वीक निकुंबे व सुनयना (९५.६) टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष क्रिशन जैन, सचिव नरेश जैन, प्राचार्य शिवारामाकृष्णा यांनी कौतुक केले.मॅक्रून स्टुडंट्स अॅकेडमी, वणीवणी येथील मॅक्रून स्टुडंट्स अॅकेडमीचा सीबीएसईचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेतून अंजली महाजन ही ९६.६ टक्के गुण मिळवून प्रथम आली. तर अवनी चवरडोल (९४), साक्षी वाघमारे (९३), सार्थक माधमशेट्टीवार (९२) व राहुल कुमार याने (९१.४) टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचाºयांनी कौतुक केले. सीबीएसईच्या जिल्ह्यातील शाळांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. १०० टक्के निकाल सरकारी आणि खासगी शाळांनी दिले आहे.ऋतुजा होणार डॉक्टरऋतुजा म्हणाली, यापुढे मला डॉक्टर बनायचे आहे. माझे आजोबा आणि आई यांचीही ईच्छा तशीच आहे. आमच्या शिक्षकांनी या यशासाठी खास मेहनत घेतली. चांगला अभ्यास करीत राहणे हेच यापुढचे ध्येय असेल.जिल्ह्यातील शाळानिहाय टॉपरऋतुजा केतन बाहेती (९८.६०) यवतमाळ पब्लिक स्कूलश्रृतिका संजय शेलगावकर (९८) जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल पुसदजान्हवी सूरज राठोड (९७.८०) स्कूल आॅफ स्कॉलर्सआर्या विरेंद्र सोनटक्के (९७.८०) स्कूल आॅफ स्कॉलर्सहिमांशू पराशर सरकाटे (९७.२०) जवाहर नवोदय विद्यालय बेलोरापरिमल जयकुमार कोठारी (९७.२०) पोदार इंटरनॅशनल स्कूलअंजली महाजन (९६.६०) मॅक्रून स्टुडंट अकॅडमी वणीआशीष झोडे (९६.४०) स्वर्णलिला इंटरनॅशनल स्कूल वणीकेतन चिंचुलकर (९६.४०) स्वर्णलिला इंटरनॅशनल स्कूल वणीसारा छाजेड (९६.४०) स्वर्णलिला इंटरनॅशनल स्कूल वणीसमीक्षा यादवराव बिडकर (९४) गुरुकुल इंग्लिश स्कूल पांढरकवडा
‘वायपीएस’ची ऋतुजा बाहेती जिल्ह्यात पहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:26 PM
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. येथील यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा केतन बाहेती हिने जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावत विदर्भातील ‘टॉपर’ विद्यार्थ्यांमध्येही स्थान मिळविले. ९८.६० टक्के गुण घेणाऱ्या ऋतुजाने आता डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे एक पाऊल टाकले आहे.
ठळक मुद्देसीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर : यवतमाळ पब्लिक स्कूलची १०० टक्के यशाची परंपरा कायम