लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळ : शेतकरी, बेरोजगार, निराधार आदींच्या प्रश्नांना घेवून नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर मंगरूळ येथे युवक काँगे्रेसतर्फे चक्काजाम करण्यात आला. यामुळे जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांना अटक करून सुटका करण्यात आली.शेतकऱ्यांना विनाअट पेन्शन द्यावी, निराधारांचे मानधन दरमहा तीन हजार रुपये करावे, बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपये भत्ता देण्यात यावा, मंगरुळ ते वाई रस्त्याचे रखडलेले काम त्वरीमत सुरू करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले.या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कुणाल जतकर, परेश राऊत, भगवान गाढवे, अमोल मस्के, प्रभाकर बामणे, उमेश पवार, विठ्ठल मेश्राम, सुरेश सांगळे, नंदकिशोर गाढवे, ओंकार काळे, अजय गेडाम, विठोबा घोटेकर, प्रवीण भोंबे, किशोर दोडेकर, विनोद मेश्राम, दिलीप मेश्राम, विजय मेश्राम, अंकुश जोगे, रवींद्र भोंबे, रामप्रसाद राऊत, ज्ञानेश्वर सहारे, रंजना जाधव, सुशिला ढाके, कौशल्याबाई गाढवे, विमल आत्राम, सीताबाई उईके, दुर्गा गाडेकर, निर्मला भराडे, पुष्पा भराडे, नंदा नरोडे, वैजयंती सांगळे आदी सहभागी झाले होते.
युवक काँग्रेसचा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:51 PM
शेतकरी, बेरोजगार, निराधार आदींच्या प्रश्नांना घेवून नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर मंगरूळ येथे युवक काँगे्रेसतर्फे चक्काजाम करण्यात आला. यामुळे जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांना अटक करून सुटका करण्यात आली.
ठळक मुद्देआंदोलकांना अटक व सुटका : मंगरूळ येथे दीड तास वाहतूक ठप्प