युवक काँग्रेसची ‘वीरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 08:50 PM2018-11-02T20:50:38+5:302018-11-02T20:51:37+5:30

प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला.

Yuva Congress's 'Virugiri' | युवक काँग्रेसची ‘वीरूगिरी’

युवक काँग्रेसची ‘वीरूगिरी’

Next
ठळक मुद्देकृत्रिम पाणीटंचाई : यवतमाळात १५ दिवसांपासून नळच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला. या विरोधात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी दर्डानगर पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी आंदोलन केले.
शहरातील वाघापूर, लोहारा परिसरात नळाचे पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांना पुन्हा टँकरने पाणी आणावे लागत आहे. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या दूषित पाण्यामुळे अनेकांना ताप, जुलाब व त्वचेचे आजार झाले होते. प्रभाग १४, १५, २५, २६ मध्ये नळाचे पाणीच नाही. दर्डानगर व सुयोगनगर पाण्याच्या टाकीवरून पुरवठा होणेच बंद आहे. झाला तरी अतिशय अशुद्ध पाणी दिले जाते. वाघापूर परिसरातील वैशालीनगर, जयविजयचौक, नेताजीनगर, अंबानगर, पटवारी कॉलनी, राजस्व कॉलनी, पारसनगरी, वैभवनगर, राऊतनगर, मैथिलीनगर, चाणक्यनगर, एकतानगर, सिध्देश्वरनगर, शुभम कॉलनी, महाविरनगर, सानेगुरूजीनगर परिसरात सातत्याने दूषित पाणीपुरवठा केला. आता १५ दिवसापासून नळच नाही. यामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दर्डानगर पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, युवकचे यवतमाळ विधानसभाध्यक्ष विक्की राऊत, काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष उषा दिवटे, घनश्याम अत्रे, उमेश इंगळे, अरूण ठाकूर, अजय किन्हीकर, दत्ता हाडके, राजस तेलगोटे उपस्थित होते. सुमारे दीड तास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्यानंतर कोणीच दखल न घेतल्याने पदाधिकाºयांनी जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले. तेथेही कोणीच जबाबदार अधिकारी नसल्याने अखेर लिपिकाला निवदेन दिले.

तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
शहरात एकाच वेळी अनेक कामे सुरू आहे. वीज कंपनी भूमिगत केबल टाकत असताना पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन मार्इंदे चौकात फुटली. या दुरूस्ती कामातही अनेक अडथळे येत आहे. येथे काम करताना एका कामगाराला विजेचा शॉक लागल्याची माहिती आहे. त्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहराचाच पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जीवन प्राधिकरणच्या सूत्राने सांगितले.

Web Title: Yuva Congress's 'Virugiri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.