शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

झापरवाडी ग्रामस्थांनी रस्त्याचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:26 AM

जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील टोकावरील झापरवाडी येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देनागरिक संतप्त : काम निकृष्ट होत असल्याचा आरोप

ऑनलाईन लोकमतआर्णी : जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील टोकावरील झापरवाडी येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी ते बंद पाडले.झापरवाडी येथील रस्त्याचे काम पुसद येथील कंत्राटदाराने २० टक्के कमी दराची निविदा भरून घेतले आहे. कंत्राटदाराने गावात कामाला सुरूवात केली. मात्र काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंत्यांना तक्रार देऊन काम बंद करण्याची मागणी केली. पूर्ण साहित्य उपलब्ध झाल्याशिवाय काम सुरु करु नये, अन्यथा जनआंदोलन ऊभारू, असा ईशाराही त्यांनी दिला.दरम्यान, कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाला सुरूवात केली. मात्र जेमतेम २०० मीटरचे काम होताच गावकऱ्यांनी ते बंद पाडले. मात्र वरिष्ठ अधिकाºयांनी अद्याप झापरवडीला भेट दिली नाही. झापरवाडी हे माजी जिल्हा परिषद सदस्य सोनबा मंगाम यांचे गाव आहे. विद्यमान सदस्य प्रकाश राठोड हे सुद्धा याच भागातील आहे. गावकºयांनी त्यांच्याकडेही तक्रार केली. त्यांनी काम निकृष्ट दर्जाचे होणार नाही, याची काळजी घेण्याची ग्वाही दिली.या रस्त्याबाबत गावकºयांची तक्रार आल्याचे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्णीचे उपअभियंता भेंडे यांनी सांगितले. मात्र त्यावर काय कारवाई झाली, याबाबत ते काहीही सांगू शकले नाही.लोकप्रतिनिधी, प्रशासन प्रचंड उदासीनजिल्हा परिषदेच्या रस्त्यांबाबत नेहमीच ओरड होते. पुसद, उमरखेड भागात तर एकाच रस्त्यावर दोनदा काम करण्यात आल्याचे उघड झाले. चांगल्या रस्त्यावर दुसºयांदा काम दर्शवून लाखोंचा मलीदा लाटला गेल्याचेही दिसून आले. तरीही लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन आहे. कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असताना त्यांना कुणीही आडकाठी आणताना दिसत नाही. त्यामुळे कंत्राटदारांची हिम्मत वाढत आहे. अखेर गावकºयांनाच पुढाकार घेऊन अशी कामे थांबवावी लागतात. लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे कंत्राटदारांशी लागेबांधे तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.