आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा परिषदेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त गुरूवारी येथील सहकार भवनात महिलांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष, बांधकाम व अर्थ सभापती निमीष मानकर, महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडळकर, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, आरोग्य व शिक्षण सभापती नंदिनी दरणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, डॉ.स्नेहा भुयार उपस्थित होत्या. यावेळी प्रथम अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला. डॉ.स्नेहा भुयार यांनी महिलांना कॅन्सरबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्ष माधुरी आडे यांनी महिला शक्तीचा उपयोग राष्ट्र विकासात व्हावा, असे अवाहन केले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्रथम क्रमांक दारव्हा उपजिल्हा रुग्णालय (५०हजार), फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र (२५ हजार), व जामनाईक आरोग्य उपकेंद्र (१५ हजार), द्वितीय पुरस्कार माणिकवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र (१५ हजार), मानोली उपकेंद्र (१० हजार), तर तृतीय पुरस्कार पहूर प्राथमिक आरोग्य केंद्र (१० हजार), आणि तिवरी उपकेंद्र (पाच हजार) यांना देण्यात आला. जिल्हास्तरीय आशा पुरस्कार उमरखेड तालुक्यातील विडूळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कौशल्या राठोड आणि बेलोरा केंद्रातील लता सहारे यांना, नाविण्यपूर्ण आशा पुरस्कार वणी तालुक्यातील राजूर केंद्रातील अनिता जाधव आणि नेर तालुक्यातील माणिकवाडा केंद्रातील सुरेखा उघडे यांना, तर गटप्रवर्तक पुरस्कार पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी केंद्रातील रेखा राजगडकर, उमरखेड तालुक्यातील सोनदाभी केंद्रातील राणी राजपल्लू आणि वणी तालुक्यातील कोलगाव केंद्रातील नमा दुधे यांना देण्यात आला.प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दुर्योधन चव्हाण, संचालन साधना दुबे यांनी केले. आभार समाजकल्याण अधिकारी मंगला मून यांनी मानले. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, विशाल जाधव यांच्यासह आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका, परिचारिका, अधिपरिचारिका आदी उपस्थित होत्या.
जिल्हा परिषदेतर्फे महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 9:58 PM
जिल्हा परिषदेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त गुरूवारी येथील सहकार भवनात महिलांचा गौरव करण्यात आला.
ठळक मुद्देमहिला दिन : आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशांना पुरस्कारांचे वितरण