शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

जिल्हा परिषद शाळेत शिकूनही होता येते यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 9:50 PM

हा खूप मोठा जिल्हा आहे. कामांचा ढिगही मोठा आहे. त्याबाबतीत नियोजन करू. सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी म्हणून मी काम करणार आहे.

ठळक मुद्देराजेश देशमुख यांची यशोगाथा : सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी!

अविनाश साबापुरे/रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हा खूप मोठा जिल्हा आहे. कामांचा ढिगही मोठा आहे. त्याबाबतीत नियोजन करू. सर्वसामान्यांचा जिल्हाधिकारी म्हणून मी काम करणार आहे. कोणती हेल्पलाईन वगैरे आपण जाहीर करणार नाही. पण सर्वांसाठी मी सहज उपलब्ध राहील. आज संपर्काची वेगवेगळी साधने आहेत, जनतेने कुठल्याही साधनाद्वारे माझ्याशी संपर्क साधला तरी मी भेटेल, अशा शब्दात नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लोकाभिमुख कार्यशैलीची इच्छा बोलून दाखविली.जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते.प्रामाणिक परिश्रम हाच यशाचा मंत्रते म्हणाले, देवळालीच्या (जि. उस्मानाबाद) जिल्हा परिषद शाळेतच माझे शिक्षण झाले. आई कुसूम नगरपरिषदेच्या तर वडील भागवतराव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही मुंबईसारख्या ठिकाणी पदवीचे शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षा कोणत्याही भाषेतून देता येते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत मुलगा शिकला म्हणजे, तो मागे पडेल, असा समज ठेवू नये. प्रामाणिक प्रयत्न आणि परिश्रम केले तर यश मिळतेच.शाळांचे यश लोकांपर्यंत पोहोचवासातारामध्ये सीईओ असताना आम्ही डिजिटल व्हॅन तयार केली. त्यात ५० उत्तम शाळांचे प्रेझेंटेशन केले आणि ही व्हॅन गावोगावी फिरविली. यवतमाळ जिल्ह्यातही चांगले प्रयत्न सुरू आहेत. फक्त जिल्हा परिषद शाळांची यशोगाथा घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, असे डॉ. राजेश देशमुख म्हणाले.प्रशासन आणि वैयक्तिक जीवन ही कसरतच एकाच वेळी प्रशासन आणि कौटुंबिक जबाबदाºया पार पाडणे ही कसरतच असते. आताच माझ्या वडिलांचे कॅन्सरचे आॅपरेशन झाले. पत्नी विजया घरातील जबाबदाºया सक्षमपणे हाताळते. त्यामुळे मला प्रशासकीय जबाबदाºयांवर ‘फोकस’ ठेवणे शक्य होते. मुलगी आर्या आणि मुलगा आदित्य शिक्षणात हुशार आहेत, असे ते म्हणाले.१८ कॅन्सरग्रस्तांना दिले जीवदानसातारा येथे सीईओ म्हणून काम करताना डॉ. राजेश देशमुख यांनी कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी प्रभावी काम केले. त्याविषयी जिल्हाधिकारी म्हणाले, हा माझ्या कामाचा भाग नव्हता, पण जबाबदारी म्हणून आम्ही ते केले. अमेरिकेत असलेला आणि सध्या मुंबईत असलेल्या एका मित्रामुळे मला या कामात योगदान देता आले. तो मित्र आणि मी मुंबईत झालेल्या कर्करोग संशोधकांच्या जागतिक परिषदेत गेलो होतो. पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील कॅन्सर १०० नव्हे २०० टक्के बरा होतो, हे आम्हाला कळले. पण दुर्दैव म्हणजे, एखाद्याला कॅन्सर झाला हे जेव्हा कळते, तेव्हा तो चौथ्या टप्प्यात पोहोचलेला असतो. ही बाब टाळून रूग्णांना वाचविण्यासाठी आम्ही ‘कॅन्सर साक्षर सातारा’ हा उपक्रम राबविला. साताºयातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, एएनएम यांना खास प्रशिक्षण दिले. गावकºयांशी संपर्क वाढविण्यास सांगितले. कुणामध्ये कॅन्सरची प्राथमिक लक्षणे दिसतात का हे शोधायला लावले. अशा संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार देण्यासाठी शंभराहून अधिक शिबिरे घेतली. २०० हून अधिक रूग्ण ‘सस्पेक्टेड’ आढळले. गरजू रूग्णांना साताºयाच्या दोन विशेष रूग्णालयात आणून उपचार केले. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १० लाखांचा निधी वेगळा ठेवला. १८ रूग्णांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्या सर्वांना वाचविण्यात आम्हाला यश आले.