लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मेपूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे.ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. आता बहुतांश विभागांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेने पार पाडल्या जातात. शिक्षकांसाठी विविध गट निर्माण केले आहे. त्यानुसार अर्ज सादर केल्यानंतर त्यांना बदली दिली जाते. तसेच इतर विभागातील कर्मचाºयांच्याही बदल्या आॅनलाईन पद्धतीने केल्या जातात. बदल्यांची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांनी बदलीपात्र कर्मचाºयांच्या याद्या तयार केल्या आहे. प्रत्येक विभागाने बदलीपात्रची यादी तयार करून वरिष्ठांकडे सादर केली आहे. शिक्षण विभागानेही बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या या आधीच पंचायत समितीकडून मागविल्या होत्या. त्यानुसार याद्या तयार करण्यात आल्या आहे.आरोग्य विभागानेही बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार ठेवली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या अखत्यारितील बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार केली आहे. याशिवाय वित्त, बांधकाम, सिंचन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आदी विभागांनी बदलीपात्र कर्मचाºयांच्या याद्या तयार केल्या आहे. मात्र अद्यापही शासनाकडून बदल्यासंबंधी कोणतेही निर्देश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले नाही. जिल्हा परिषद शासन आदेशाची प्रतीक्षा करीत आहे.आतापर्यंत लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बदल्यांचे आदेश आले नव्हते. आता आचारसंहिता संपल्यामुळे कोणत्याही क्षणी बदली आदेश धडकण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेने आपली तयारी पूर्ण केली आहे. येत्या काही दिवसात शासन तथा ग्रामविकास विभागाकडून बदलीसंबंधाने आदेश येण्याची शक्यता जिल्हा परिषदेतील जाणकारांनी वर्तविली आहे. त्यामुळे सर्वांचेच शासनाच्या आदेशाकडे डोळे लागले आहे.काही प्रस्ताव परत पाठविले१५ मे २०१४ रोजी ग्रामविकास विभागाने शासन निर्णयानुसार दिव्यांग, कर्करोगी, हृदयरोगी, बायपास शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, कुमारिका, क्षयरोगी, ५३ वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी यांनी पुरावा सादर केल्यास टक्केवारीनुसार कधीही बदली करण्याचे आदेश दिले होते. मात्र असे काही प्रस्ताव डेप्यूटी सीईओंनी परत पाठविले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 10:24 PM
जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मेपूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात.
ठळक मुद्देयाद्या तयार : मुहूर्ताची प्रतीक्षा, शासनाच्या आदेशाकडे नजरा