लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे जवळपास २५ कोटींचा निधी अखर्चित आहे. हा निधी येत्या मार्चपूर्वी खर्च घालण्याचे आव्हान आहे.बांधकाम विभाग क्रमांक एक आणि दोनला शासनाने विविध विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन दिला. यात २०१६ मध्ये तब्बल १२ कोटी ७४ लाख रूपये कोलाम पोड जोडणी रस्त्यांसाठी उपलब्ध करून दिले गेले. मात्र गेल्या दोन वर्षात यापैकी केवळ एक कोटी ९८ लाख रूपये खर्च झाले. त्यामुळे अद्याप १० कोटी ७६ लाखांचा निधी शिल्लक आहे. ३०५४ अंतर्गत सामान्य कार्यक्रमांतर्गत सहा कोटी तीन लाख मिळाले. त्यापैकी एक कोटी ६७ लाखांचा खर्च झाल्याने अद्याप चार कोटी ३५ लाखांचा निधी पडून आहे.आदिवासी उपाययोजनांतर्गत बिगर अनुशेषासाठी एक कोटी ९० लाखांचा निधी मिळाला. त्यापैकी एक कोटी ८० लाख रूपये शिल्लक आहेत. किमान गरजा कार्यक्रमांतर्गत एक कोटी ४८ लाखांपैकी ५२ लाख रूपये शिल्लक आहे. ‘क’ वर्गातील यात्रा स्थळांचा विकास करण्यासाठी दोन वर्षात दोन कोटी १९ लाख मिळाले. त्यापैकी एक कोटी ३८ लाख रूपये शिल्लक आहे. याशिवाय रस्ते विकास व मजबुतीकरण, ५०५४ मध्ये टीएसपीअंतर्गत रस्ते व पुलांसाठी एक कोटी ७७ लाख मिळाले. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी पाच कोटी १४ लाख मिळाले. त्यापैकी ८७ लाख शिल्लक आहे.या प्रमुख निधीशिवाय विविध शीर्षाखाली आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे बांधकाम, आयुर्वेद दवाखान्यांचे बांधकाम, जिल्हा व इतर मार्ग दुरुस्ती, आदिवासी उपाययोजना बिगर अनुशेष, किमान गरजा कार्यक्रम, शेतकºयांच्या शेतमालासाठी मॉल बांधणे आदीसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. मात्र यापैकी बहुतांश निधी शिल्लक आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा निधी मार्चपूर्वी खर्च न झाल्यास तो शासन जमा होण्याचा धोका वाढला आहे.अनेक कोलाम पोड रस्त्याविनाकोलाम पोड जोडणी कार्यक्रम अंतर्गत दोन वर्षांपासून निधी प्राप्त झाला. मात्र अद्याप बहुतांश कोलाम पोड रस्त्याविना आहेत. या कामांची सर्व प्रक्रिया आता कुठे पार पडली. मात्र त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळणे बाकी आहे. यावरून नुकताच दोन पदाधिकाºयांमध्ये वादही झाला होता. दोन वर्षांपासू निधी पडून असताना आता हा निधी घाईगडबडीत खर्ची घालण्यासाठी बांंधकामने कंबर कसली आहे. यात बहुतांश कामे एकाच पदाधिकाºयाच्या क्षेत्रातील असल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद बांधकामकडे कोट्यवधी अखर्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 9:30 PM
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे जवळपास २५ कोटींचा निधी अखर्चित आहे. हा निधी येत्या मार्चपूर्वी खर्च घालण्याचे आव्हान आहे. बांधकाम विभाग क्रमांक एक आणि दोनला शासनाने विविध विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन दिला.
ठळक मुद्दे२५ कोटींच्यावर निधी : मार्चनंतर निधी परत जाण्याचा धोका, आरोग्य केंद्रांचे बांधकाम रखडले