शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

जिल्हा परिषदेच्या विंधन विहिरी झाल्याच नाही

By admin | Published: June 09, 2014 12:09 AM

जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा काभार पूर्णत: ढेपाळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे पदसिध्द सभापती असूनही मंजूर २७ विंधन विहिरी उन्हाळ्य़ात पूर्ण करता आल्या नाही. मृक्ष नक्षत्र लागल्यानंतर

यवतमाळ : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा काभार पूर्णत: ढेपाळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे पदसिध्द सभापती असूनही मंजूर २७ विंधन विहिरी उन्हाळ्य़ात पूर्ण करता आल्या नाही. मृक्ष नक्षत्र लागल्यानंतर आता कुठे पंचायत समित्यांना विंधन विहिरी खोदण्याचे आदेश दिले आहे. केवळ टोलवा टोलवीचा प्रकार सुरू आहे. जिल्ह्यातील १६ पंचायत समित्यांमध्ये टंचाईग्रस्त गावात तातडीची उपाय योजना म्हणून ४७ विधंन विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. भू-जल सर्व्हेक्षण विभागाने याची पाहणी करून यापैकी २७ ठिकाणीच विहीर तयार करण्याची परवानगी दिली. यासाठी तब्बल २७ लाख ७0 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद यांत्रिक विभागाने मारेगाव तालुक्यातील कानड, चोपण आणि वणी तालुक्यातील रागंणा येथे विंधन विहीर तयार केली आहे. मात्र अजूनही २४ विंधन विहीर झाल्याच नाही. २४ एप्रिल रोजी आर्णी तालुक्यात किन्ही धनसिंग, किन्हीगाव, केळापूरमध्ये मारेगाव पुनर्वसन, बहात्तर, दारव्हा तालुक्यातील पहापळ, बरबडी, घाटंजीतील टिपेश्‍वर पुनर्वसन, शिवणी कोलाम पोड, शिरोली पारधी बेडा, कोची बेलघर, उमरखेड तालुक्यात बारा, राळेगावमध्ये खैरगावपोड, वरध येथे विंधन विहिरी तयार करण्याचे आदेश पंचायत समित्यांना दिले. त्यानंतर  ८ मे रोजी पुसद तालुक्यातील शेलु खुर्द, मोख, शिवणी, चिंचघाट, वणीतील ढाकोरी बोरी, कळंबमध्ये मंगरूळ येथे विंधन विहिरी तयार करण्याचे आदेश दिले. त्यापाठोपाठ ९ मे रोजी  यवतमाळ पंचायत समितीत बारडतांडा, बाभूळगाव येथे दिघी क्रमांक दोन, मारेगाव येथे घोगुलदरा, बिहाडी पोड, कोतुरला, नवरगाव, अर्जुनी गावपोड येथील विंधन विहिरी तयार करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना पैशाचे आवंटन पंचायत समित्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे पंचायत समितीस्तरावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. बोअरवेल खोदणार्‍यांनी पंचायत समितीकडे आवंटन किती आहे, तरच कामाचा करार करा, अशी भूमिका घेतली. पैसाच नसल्याने कोणीच करार केला नाही. केवळ उदासीन प्रवृत्तीमुळे संपूर्ण उन्हाळ्य़ात केवळ तीन विंधन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. यावरून जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाच्याबाबतीत किती सजग आहे हे दिसून येते. उन्हाळ्य़ात पाणी नसल्याने पायपीट करणार्‍या ग्रामस्थांच्या हाल अपेष्टांची जाणीव यंत्रणेतील एका अधिकारी कर्मचार्‍याला नसल्याचे दिसून येते. पैसा असुन वेळेत काम करता आले नाही. आता पावसाळा तोंडावर आल्यानंतरही काम होते की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या उन्हाळ्य़ात मंजुर झालेले काम पुढच्या उन्हाळ्य़ापूर्वी तरी पूर्ण व्हावे, एवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांना आहे. खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अधिपत्याखाली येत असलेल्या विभागाची ही स्थिती आहे. यावरून इतर विभागात काय चालले आहे, याची कल्पना येते. लोककल्याणकारी योजना फाईलांमध्ये दडपण्यात तरबेज असलेल्या यंत्रणेला प्रत्यक्ष कामाला लावण्यात येथे अध्यक्ष प्रवीण देशमुखही अपयशी झाले असे, म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या मुद्दावर अध्यक्षांनी अनेकदा पाणीपुरवठा समितीची बैठक घेतली आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष कार्यवाही मात्र शून्यच असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)