शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

झेडपीचे शिलकीचे अंदाजपत्रक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 5:00 AM

बांधकाम विभाग क्र. १ साठी ३ कोटी ६२ लाख तर क्र. २ साठी १ कोटी ६८ लाख ५० हजारांच्या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात आहे. सिंचन विभागासाठी ७२ लाख ५० हजार तर सार्वजनिक आरोग्यासाठी ३८ लाख, आरोग्य अभियांत्रिकीसाठी २५ लाख तर कृषी योजनांसाठी दोन कोटी २७ लाख ६३ हजारांची तरतूद करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेचे २०२१-२२ चे सुधारित आणि २०२२-२३ च्या मूळ अंदाजपत्रकाला रविवारी मंजुरी देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी रविवारी विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत अंदाजपत्रक सादर केले. २०२१-२२ मध्ये २४ कोटी ८४ लाख ३१ हजारांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. मात्र वर्षभरात हे अंदाजपत्रक २५ कोटी नऊ लाख ४० हजार ९० रुपयांवर पोहोचले. या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. सीईओ डॉ. पांचाळ यांनी २०२२-२३ साठी २५ कोटी ७५ लाख ८५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. त्यात विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली. बांधकाम विभाग क्र. १ साठी ३ कोटी ६२ लाख तर क्र. २ साठी १ कोटी ६८ लाख ५० हजारांच्या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात आहे. सिंचन विभागासाठी ७२ लाख ५० हजार तर सार्वजनिक आरोग्यासाठी ३८ लाख, आरोग्य अभियांत्रिकीसाठी २५ लाख तर कृषी योजनांसाठी दोन कोटी २७ लाख ६३ हजारांची तरतूद करण्यात आली. पशुसंवर्धन विभागासाठी १ कोटी ११ लाख ५० हजार, समाज कल्याण विभागासाठी २ कोटी ४५ लाख ५५ हजार, अपंग कल्याणासाठी १ कोटी १४ लाख १ हजार तर महिला व बालकल्याण विभागासाठी १ कोटी ४० लाख १ हजारांची तरतूद करण्यात आली. सामूहिक विकासासाठी १ कोटी ४० लाख तर संकीर्ण खर्चासाठी तब्बल ४ कोटी २३ लाखांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. याशिवाय सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग, निवृत्ती वेतन आदींसाठीही तरतूद करण्यात आली आहे. २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात महसुली खर्च २५ कोटी ७५ लाख ८५ हजार, भांडवली खर्च पाच कोटी ४२ लाख रुपये होणार असल्याचे अंदाजपत्रकात नमूद करण्यात आली. या खर्चानुसार गेल्यावर्षीपेक्षा हे अंदाजपत्रक १ लाख ४० हजार ७५० रुपये शिलकीचे ठरले आहे. दरवर्षी अर्थ समितीचे सभापती अंदाजपत्रक सादर करतात. मात्र यावेळी पदाधिकाऱ्यांची मुदत २० मार्च रोजी संपतुष्टात आली. त्यामुळे प्रशासक म्हणून सीईओंच्या हाती सर्व सूत्रे एकवटली आहे. त्यांनीच रविवारी नवीन अर्थसंकल्प सादर केला. अधिकाऱ्यांच्या सभेत त्याला मंजुरीही देण्यात आली. 

‘सुंदर माझे कार्यालया’साठी ५० लाख यावर्षीच्या अंदाजपत्रकात सीईओंनी सुंदर माझे कार्यालयासाठी तब्बल ५० लाखांची तरतूद केली आहे. अंदाजपत्रकात विविध नावीन्यपूर्ण योजनांसाठी तरतूद करण्यात आली. त्यात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमांसाठी २५ लाख, महादीप योजनेसाठी २५ लाख, झेप उपक्रमासाठी २० लाख, बाला योजनेसाठी २५ लाख, सहस्त्रकुंड पर्यटनस्थळाच्या विकासासाठी २० लाख, हुतात्मा स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी २ लाख तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वास्तूंच्या सौरविद्युतीकरणासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. याशिवाय मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कृषी अवजारे पुरविण्यासाठी ५० लाख, तीन हेक्टरपर्यंतच्या भूधारकांसाठी विविध योजना राबविण्यासाठी १ कोटी २० लाख आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी कृषिपयोगी यंत्रे, बियाणे व अवजारे वाटपासाठी एक कोटींची तरतूद केली आहे. 

अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करून अंदाजपत्रकाचा उद्देश सफल करण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक योजनांमध्ये ३० टक्के महिला लाभार्थी असणे सक्तीचे करून शासनाच्या महिला धोरणाला पूरक अंदाजपत्रक सादर केले. दिव्यांग महिला, बालके, मागासवर्गीय आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाकरिता वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवून विकासाची नवीन दिशा ठरविण्याकडे एक आशादायक पाऊल म्हणून २०२२-२३ चे मूळ अंदाजपत्रक सादर केले. - डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सीईओ, जिल्हा परिषद, यवतमाळ.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद