नीरव मोदी मनरेगाचा पैसा घेऊन पळाले, राहुल गांधी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 06:11 AM2018-06-14T06:11:12+5:302018-06-14T06:11:12+5:30

नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत. हे दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षा$चा पैसा घेऊन पळाले, असा थेट आरोप काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला.

Neerav Modi got away with the money of MNREGA, Rahul Gandhi's allegation | नीरव मोदी मनरेगाचा पैसा घेऊन पळाले, राहुल गांधी यांचा आरोप

नीरव मोदी मनरेगाचा पैसा घेऊन पळाले, राहुल गांधी यांचा आरोप

googlenewsNext

- राजेश भोजेकर/ घनश्याम नवघडे 
नांदेड (जि.चंद्रपूर) : नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत. हे दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षा$चा पैसा घेऊन पळाले, असा थेट आरोप काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला.
एचएमटी तांदळाचे जनक, कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी आले होते. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, मोदी सरकार गरिबांच्या खिशातून पैसे काढून श्रीमंतांना देत आहे. पंतप्रधान मोदींनी नीरव मोदीला ३५ हजार कोटी दिले. यातील पाच कोटी दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधक शेतकºयांना दिले असते तर मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असती, असा टोला त्यांनी लागावला. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही तो पैसा नक्कीच शेतकºयांच्या खिशात टाकू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राहुल म्हणाले, गरिबांबद्दल कळवळा आहे म्हणूनच येथे आलो. आमचे सरकार सत्तेवर येताच पंजाब, कर्नाटकमधील शेतकºयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. पण केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेवर असलेले सरकार उद्योगपतींचे सरकार आहे. ते शेतकºयांचे कर्ज माफ करणार नाही. मोदींचे मार्केटिंग १५-२० उद्योगपती करतात. या लोकांना मोदींनी सांगितले होते की, सत्तेवर आलो तर मी तुम्हाला कर्जमुक्त करेल. त्याप्रमाणे ते वागत आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गहलोत, प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष विजय वडेट्टीवार, माजी खासदार नाना पटोले आदी उपस्थित होते.

खोब्रागडे कुटुंबीयांशी साधला हृद्य संवाद
राहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. दादाजींनी तांदळाच्या नवनवीन वाणाच्या संशोधनासाठी आपले अख्खे आयुष्य वेचले. पण त्यांचे कुटुंबीय हलाखीचे जीवन जगत असल्याचे पाहून ते भावूक झाले होते.
दादाजींचा मुलगा मित्रजीत यांनी दादाजींचे संशोधन कार्य पुढे नेण्यासाठी शंभर एकर शेती, शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी, दादाजींना मरणोपरांत भारतरत्न मिळावा, ही इच्छा बोलून दाखविली. त्यावर आ. विजय वडेट्टीवार यांनी अडीच लाखांचा धनादेश दिला, तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाच लाखांचा धनादेश पोहचता करण्याची ग्वाही दिली. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी एक लाख रुपये व कुटुंबातील एकाला नोकरी देऊ असे सांगितले.
 

Web Title: Neerav Modi got away with the money of MNREGA, Rahul Gandhi's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.